अमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्हाभरातील ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण गत आठवड्यात काढण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने अस्तित्वात येत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ११ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदासाठीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आटोपला आहे. त्यानंतर शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हाभरातील १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठीची निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे गावोगावी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
बॉक्स
१४ तालुक्यांत विशेष सभा
सरपंच व उपसरपंचपदासाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया १२ फेब्रुवारी रोजी १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतींच्या नव्या शिलेदारांची निवड केली जाणार आहे.