शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाच्या उत्तरार्धातही जपले समाजभान

By admin | Updated: April 20, 2017 00:18 IST

संपूर्ण जीवनात शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे हात सरत्या आयुष्यात लेखणीचा आधार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

आदर्श : धामणगावच्या दोन वृद्धांची प्रेरणादायी सेवामोहन राऊत धामणगाव रेल्वेसंपूर्ण जीवनात शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे हात सरत्या आयुष्यात लेखणीचा आधार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत येणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांना बँकेच्या कामात मदत करण्याचा वसा या दोन्ही शेतकऱ्यांनी घेतला आहे. जुना धामणगाव येथील या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत मनोहर नामदेव तायडे व ज्ञानेश्वर गोठाणे. वृद्ध शेतकऱ्यांसह नागरिकांना मदत व्हावी, या उद्देशाने उपरोक्त शेतकऱ्यांची जोडगोळी अमरावती जिल्हा मध्यवर्त्ती सहकारी बँकेसमोर बसून बँकेत येणाऱ्या वृद्धांना बँकेच्या स्लिप भरून देणे, पासबुकमध्ये एन्ट्री करून देणे, त्यांच्या खात्यातील रकमेचा हिशेब समजावून सांगणे आदी कामे ते करीत आहेत. मनोहर तायडे व ज्ञानेश्वर गोठाणे यांनी मागील अनेक पणन् महासंघात कर्मचारी म्हणून जबाबदारी सांभाळली. नामदेव यांना दोन मुले. घरची आर्थिक स्थिती ठिकठाक असली तरी निरक्षर शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने ते ही सेवा अविरत देत आहेत. ज्ञानेश्वर गोठाणे यांना एक मुलगा आहे़ परंतु समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी येणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांना मदत करण्याचे काम ते करीत आहेत. यादोन्ही वृद्धांना शेतकरी, लाभार्थी स्वेच्छेने दोन-पाच रूपये देतात. या पैशांमधून ग्रामीण भागातून आलेल्या वृद्धांना चहा पाजण्याचे कामही हे दोघे करतात़ निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी एखादा वृद्ध लाभार्थी आला नाही तर त्याची हे दोघे आस्थेने चौकशी करतात. बँकेसमोर बसून निरक्षरांना मदत करण्यात यादोघांना मोठा आनंद होतो़ आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांनी जपलेले समाजभान वाखाणण्यासारखे आहे.