शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रावरील सातबारा योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 19, 2015 00:40 IST

शासनाने पटवाऱ्यांना सातबारा आॅनलाईन करण्याचे आदेश दिल्यापासून हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत त्यात अनेक चुका झाल्या आहेत.

जुन्याच नोंदी : अंजनगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत, कर्ज मिळण्यास अपात्रतेची पावतीअंजनगाव सुर्जी : शासनाने पटवाऱ्यांना सातबारा आॅनलाईन करण्याचे आदेश दिल्यापासून हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत त्यात अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे ‘अद्ययावत सातबारा’ ही केवळ लोकप्रिय घोषणा ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सातबारा आॅनलाईन काढल्यावरदेखील त्यांच्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. या सातबाऱ्यामध्ये जुन्याच नोंदी असून कित्येक सातबाऱ्यामधील मालकाचे नाव गायब आहेत. मात्र, कर्ज घेतल्याची नोंद सातबाऱ्यावर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेताना अडचणी येत आहेत. सेतू केंद्रावर गावोगावी शेतकऱ्यांनी सातबारा मिळविण्यासाठी गर्दी केली असून प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी सातबारा न पडल्याने निराशा आली आहे.शासनाने पटवाऱ्यांना सातबारा यापुढे गावातून न देण्याचे आदेश दिले व सर्व शेतकऱ्यांनी आपला सातबारा संगणक सेतू केंद्रातून घेण्याचे आवाहन केले. मात्र, योजनेचे केंद्रीकरण करुन आपण एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या शेतकरी खातेदारांना बोटावर मोजण्याइतपत सेतू केंद्रातून खरोखरच सातबारा वितरित करु शकतो काय? याचा विचार मात्र झाला नाही. पर्यायाने ही संपूर्ण योजना कोलमोडली आहे व याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. आपल्या हक्काचे कमाईचे साधन गेले म्हणून पटवारी वर्गानेही सातबारा अद्ययावत करण्याच्या नोंदी संगणकात केल्याच नाहीत, याचे अनेक पुरावे आहेत. स्थानिक तहसीलच्या सेतू केंद्रात सातबारा प्राप्त झाला नाही. म्हणून महसूल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांनी तातडीने सर्व तलाठ्यांची सभा घेऊन सातबाराच्या नोंदी तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे. पण, हे काम कितीही घाईने केली तरी कामे आटोपत नसल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. शासनाने निराधार योजनेचे पोस्ट खात्यामार्फत गावागावांत होणारे वेतन वितरण थांबवून बँकांमार्फत केल्याने जशा बँकांचे कामकाज गर्दीमुळे प्रभावित झाले तसेच सेतू केंद्राचे हाल होत आहेत. या योजनेचा पूर्णत: विचार करुन शेतकऱ्यांना तातडीने व गरज असल्यास पटवाऱ्यांकडून हाताने लिहिलेला सातबारा वितरित करण्याची मागणी महेश खारोळे, संजय हाडोळे, कपिल देशमुख, शंतनू भांबुरकर, श्याम गायगोले आदी युवा शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची अडचण ओळखून तातडीने सातबाऱ्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण दूर व्हावी, एवढी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.