शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील ‘सीट’ चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:05 IST

पैसे कमविण्याचा ‘शॉर्टकट’ कोणी कसा शोधून काढेल, याचा नेम नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ‘सीट’ चोरून प्रवाशांना विकण्याचा फंडा काही महाभागांनी शोधून काढला आहे. यात रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देसामान्यांचा जीवघेणा प्रवास : रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचा ‘आशीर्वाद’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पैसे कमविण्याचा ‘शॉर्टकट’ कोणी कसा शोधून काढेल, याचा नेम नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ‘सीट’ चोरून प्रवाशांना विकण्याचा फंडा काही महाभागांनी शोधून काढला आहे. यात रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.‘लोकमत’ चमूने ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मॉडेल स्टेशन, वॉशिंग युनिटसह प्लॅटफार्मवर फेरफटका मारला असता अंबा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांमध्ये ‘सीट’ विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सायंकाळी ५ वाजता प्लॅटफॉर्मला गाडी लागते तेव्हा डबे कुलूपबंद असतात. मात्र, त्यापूर्वीच जनरल डब्यात काही युवक सीट काबीज करून ठेवतात. ते कंत्राटी स्वच्छता कर्मचारीच असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे. जनरल डब्यांना कुलूप लावणे आणि गाडी प्लॅटफार्मवर आल्यानंतर उघडण्याची जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला हा प्रकार दिसू नये, ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे.चोरीच्या सीट विक्रीसाठी दलालअंबा एक्स्प्रेसमध्ये तुडुंब गर्दी ही नित्याचीच बाब आहे. आरक्षण वेळेवर मिळत नसल्याने काही जण जनरल डब्यातून प्रवासाला प्राधान्य देतात. जनरल डब्यात सीट पाहिजे असल्यास प्लॅटफार्मवर ठरलेल्या दलालांशी वाटाघाटी कराव्या लागतात. जनरल डब्यासाठी प्रतिसीट ३०० ते ४०० रूपये प्रवाशांना मोजावे लागतात. जनरल डब्यात प्रवेश मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत असलेल्या प्रवाशांना दलाल हेरतात. नाइलाज असलेल्या प्रवाशांना जनरल डब्यातही जागा विकत घेण्याचा प्रसंग ओढवत आहे.जनरल डब्यात जीवघेणा प्रवेशअंबा एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर आल्यानंतर जनरल डब्यात प्रवेशाच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवेश करावा लागतो. यावेळी चेंगराचेंगरी अन् गुदमरण्यापर्यंत विदारक स्थिती निर्माण होते. तथापि, रेल्वे पोलीस या गंभीर बाबीकडे मूकपणे बघत असल्याचे वास्तव आहे.प्लॅटफार्म लांबलचक रांग कशासाठी?जनरल डब्यात प्रवेशासाठी प्लॅटफार्मवर लांबलचक रांग लावली जाते. त्यात काही युवक शिरकाव करतात. त्यांना रेल्वे पोलिसांचा ‘आशीर्वाद’ असल्याचे दिसून येते. यावेळी एकच पोलीस कर्मचारी तैणात का ठेवले जाते, हा संशोधनाचा विषय आहे.