शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर येथील हंगामी सेवकाने राष्ट्रपतींना मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:30 IST

पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते. अशा पराकोटीच्या विवशतेला कंटाळून दर्यापूर येथील एका व्यक्तीने राष्ट्रपतींकडे निवेदनातून आपली विवशता मांडली असून, इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे.दर्यापुरातील खोलापुरी गेटस्थित जानराव राजगुरे हे १९७९ ते २००२ पर्यंत कापूस उत्पादक पणन महासंघात हंगामी सेवक म्हणून कार्यरत होते. शासनाने अचानक २००२ मध्ये कापूस खरेदी बंद केली. कार्यरत हंगामी सेवकांना कोणताही मोबदला दिला नाही. जानराव राजगुरे यांनी थातूरमातूर खाजगी कामे करून आपला संसाराचा गाडा चालवण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैव त्यांच्या कच्छपी लागले. आधीच त्यांचा मुलगा २५ वर्षांपासून ९० टक्के अपंग आहे. दुसरीकडे पत्नीला आठ वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्याने अपंगत्व आले. दोघांचे सारे जागीच करावे लागत असल्याने जानराव राजगुरे यांना त्यांच्या दिमतीला राहावे लागते. मुलासाठी मंजूर झालेल्या ६१४ रुपयांमध्ये दोघांच्या औषधासह घरामध्ये खाण्यापिण्यासाठी साहित्य आणावे लागते. नातेवाइकांसह मित्रमंडळींनी आजवर मदत केली; परंतु, दरवेळी त्यांच्यापुढे हात पसरण्याची वेळ येऊ न देण्यासाठी इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जानराव राजगुरे यांनी केली आहे.राष्ट्रपतींना निवेदनजानराव राजगुरे यांनी राष्ट्रपतींसह राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पत्रातून आपल्या वेदना कळविल्या आहेत.