शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:26 IST

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल व २० नोव्हेंबरपर्यंत लागू राहील.

ठळक मुद्देदहा टक्के वृद्धी : १ ते २० नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल व २० नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. ही भाडेवाढ साधारणत: सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी दहा टक्के याप्रमाणे २ रुपये २५ पैसे अशी वाढ होणार आहे.शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार प्रमुख चार घटकांच्या मूल्यात होणार आहे. त्यानुसार सुधारित प्रवास भाडेवाढीस राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये साधी, जलद, रात्रसेवा निमआराम आणि वातानुकूलित शिवशाही आसनी या सेवा प्रकारात १० टक्केप्रमाणे वाढ होणार आहे. यामुळे १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यात प्रौढांसाठी १० रुपये आणि मुलांसाठी ५ रुपये याप्रमाणे भाड्याची आकारणी करण्यात येणार आहे. शिवशाही आसनी या गाडीच्या भागात पहिल्या टप्प्यासाठी १५ रुपये प्रमाणे भाडेवाढ होणार आहे.एसटीच्या अन्य सेवा आहेत. त्यामध्ये वातानुकूलित शिवशाही, (शयनी) वातानुकूलित शिवनेरी (आसनी) या सेवांच्या भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. पूर्वीप्रमाणेच प्रवासी भाड्याची आकारणी केली जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार अनुज्ञेय असणाऱ्या सवलती यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी सुधारित भाडेवाढीप्रमाणे तिकिटाचा दर राहील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ज्या प्रवाशांनी दिवाळीनिमित्ताने गावी जाण्यासाठी एक ते दीड महिना अगोदर आगाऊ आरक्षण केले असेल अशा प्रवाशांकडून सुधारित भाड्यापोटी होणारी फरकाची रक्कम वाहकामार्फत वसूल केले जाईल.गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला ३० टक्के हंगामी दरवाढ करण्याची मुभा आहे. यंदाच्या दिवाळीत १० टक्के हंगामी दरवाढ करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे.- श्रीकांत गभने,विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ अमरावती