शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

१७ उमेदवारांचे भाग्य सील

By admin | Updated: June 21, 2014 01:11 IST

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शुक्रवारी १७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शुक्रवारी १७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. २४ जून रोजी मतमोजणीनंतरच नवा शिक्षक आमदार कोण? हे स्पष्ट होईल.अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यातील ४४ हजार ४८८ पैकी २७ हजार ८०३ शिक्षक मतदारांनी निवडणुकीत सहभाग नोंदविला. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत ७१ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत केवळ १३.७० टक्के इतकेच मतदान झाले. त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ३१.८३ तर दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४९.०१ तर शेवटची मतदानाची टक्केवारी ६२.५०. एवढी राहिली.मतप्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणअमरावती : मतदान प्रक्रियेदरम्यान ७१ केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात १६ हजार ३६५ मतदानापैकी ८ हजार ९७४ मतदान झाले आहे. अकोला येथे ७६६५ पैकी ५०५१, वाशीम येथे ४३१० पैकी २९३८, बुलडाणा येथे ७७९३ पैकी ५५३६ तर यवतमाळ येथे ८३५५ पैकी ५३०४ एवढे मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान हे अमरावतीत ५४.८४ टक्के तर सर्वात जास्त मतदान बुलडाणा येथे ७१.०४ टक्के झाले आहे. या निवडणुकीत एकूण ६२.५० टक्के मतदान झाले आहे. ४४ हजार ४८८ मतदारापैकी २७ हजार ८०३ एवढे मतदान झाले आहे. यात २२ हजार २९२ पुरुष तर ५५११ स्त्री मतदारांचा समावेश आहे. अमरावतीत सर्वात कमी तर बुलडाण्यात सर्वात जास्त मतदान झाल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार अमरावती येथील असल्याने अधिक चुरस वाढली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर लॅपटॉपशिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विभागातील ७१ केंद्रावर मतदार यादी शोधणे सुकर व्हावे, यासाठी प्रशासनाने लॅपटॉपची व्यवस्था केली होती. यादी क्रमांक, शिक्षक मतदारांची नावे, केंद्र क्रमांक यादी माहिती या लॅपटॉप मध्ये उपलब्ध होती. त्यामुळे मतदांराना केंद्रावर सहजतेने माहिती मिळाली. या उमेदवारांचे भाग्य झाले सीलविधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत १७ उमेदवारांचे भाग्य सील झाले आहे. यात शेखर भोयर, श्रीकृष्ण अवचार, श्रीकांत देशपांडे, वसंत खोटरे, अरुण शेळके, सुभाष गवई, वर्षा निकम, रामदास बारोटे, संतोष हुशे, विजय गुल्हाणे, नरहरी अर्डक, अजमल युसूफ खान,अहमद खान गुलाम अमानुल्ला खान, जयदीप देशमुख, सर्जेराव देशमुख, रविद्र मेंढे, प्रकाश तायडे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)