शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा/पोहरा बंदी : बकरीच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या शुक्रवारी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा स्थित वाघदा व रहमाबादच्या सीमेवरील एका शेतातील विहिरीत पडला. कुऱ्हा-चांदूर रेल्वेच्या वनकर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पाच तासांनी त्याला सुखरूप विहिरीबाहेर काढले.भारत मोतीसिंह बंगरे (रा. कुऱ्हा) यांच्या मालकीच्या शेतात शुक्रवारी पाच वर्षाचा बिबट्या बकऱ्यांच्या कळपावर चाल करून गेला. विक्रम ...

ठळक मुद्देवनविभागाचे शर्थीचे प्रयत्न : पाच तासानंतर बिबट्याला काढले बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा/पोहरा बंदी : बकरीच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या शुक्रवारी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा स्थित वाघदा व रहमाबादच्या सीमेवरील एका शेतातील विहिरीत पडला. कुऱ्हा-चांदूर रेल्वेच्या वनकर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पाच तासांनी त्याला सुखरूप विहिरीबाहेर काढले.भारत मोतीसिंह बंगरे (रा. कुऱ्हा) यांच्या मालकीच्या शेतात शुक्रवारी पाच वर्षाचा बिबट्या बकऱ्यांच्या कळपावर चाल करून गेला. विक्रम बंगरे यांनी आरडाओरडा केल्यान बिबट्याने तेथून धूम ठोकली आणि विहिरीत पडला.कुºहा वनविभागाची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कुऱ्हा व चांदूर रेल्वे रेस्क्यू पथकाने विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढले. उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनात बिबट्याला वैद्यकीय तपासणीकरिता हलविले. यावेळी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वनपाल वाडके, पोहराचे वनपाल विनोद कोहळे, चिरोडीचे वनपाल विनोद निर्मळ, वनरक्षक रवींद्र विधळे, शशिकांत कतलकर, प्रीती तिवारी, डोंगरे, आखरे, वनमजूर बिसू पठाण, विनायक लोणारे, वनरक्षक भावना पाताळवंशी यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी पं.स. सदस्य मंगेश भगोले, माजी सभापती प्रदीपसिंह पचलोरे, संतोष धुमाळे उपस्थित होते.विहिरीवर जाळ्या बसवावनक्षेत्रालगत शेतातील विहिरींवर जाळ्या बसविण्याची मागणी काही दिवसांपूर्वी वाइल्ड लाइफ अवेरनेस रिसर्च अँड रेस्क्यू सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसरंक्षकांकडे केली होती.