इंदल चव्हाण
शेतकरी नवरा नको, पण शेती हवी
अमरावती : सद्यस्थितीत नोकरदार उपवर युवकाला वधुपक्षाकडून पसंती मिळत आहे. शेतकरी नवरा नको, पण नोकरदाराकडे शेती हवी, असा हट्ट असल्याने कमावत्या युवकांनाही घरी शेती आहे की नाही, हा प्रश्न विचारला जात आहे.
तंत्रज्ञानाने कूस पालटताच कष्टाची सवय असलेले जिणे हेटाळणीचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी उपवर युवकांची वधुसंशोधनात हेटाळणी होत आहे. त्याऐवजी मुलगा दिसायला छान असावा, तो बेरोजगार नसावा, त्याला नोकरी असावी, त्याहीपेक्षा त्याच्याकडे शेती, स्वत:चे घर व अन्य साधन-संपत्ती किती, याबाबत बारकाईने चौकशी केली जात आहे. मुलगी लाडात वाढली आहे. तिला सासरी कशीचीही कमतरता भासू नये, असा मुद्दा सोयरिक संबंधात वापरला जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वत:चे घर, शेती, प्लॉट व नोकरी नाही, अशा उपवरांना कुणीही मुलगी देऊ इच्छित नसल्याने त्यांचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
सर्वाधिक मागणी डॉक्टरांना
समाजात डॉक्टरला प्रतिष्ठा पूर्वीपासून आहे. त्यामुळे चांगल्या घरच्या मुलींना मनाजोगा हुंडा देऊन आयुष्यभर सुखात ठेवण्याच्या अपेक्षेने डॉक्टर मुलाला प्रथम पसंती दिली जाते. त्यानंतर इंजिनीअर व इतर नोकरदार.
सासू-सासरे दूरच
उच्चशिक्षित व बड्या शहरात नोकरी करणाऱ्या मुली सासू-सासरे जवळ नको असल्याचे आधीच कळवितात. त्यांना दरमहा पैसे पाठवू, पण ते दूरच हवेत, अशा प्रतिक्रिया अनेकांच्या आल्याचे वधू-वर सूचक मंडळाकडून सांगण्यात आले.
कोट
मुली उच्च शिक्षणाकरिता शहरात जातात. इतरांच्या अपेक्षा, तंटे पाहून आपल्या जीवनात असा प्रसंग यायला नको, यासाठी त्या स्वत: काही गोष्टींची पारख करतात. त्यामुळे वडिलांनादेखील याला दुजोरा द्यावा लागते.
- अशोक उल्हे, कुणबी, मराठा, देशमुख वधू-वर सुचक मंडळ
----
--------------