शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

दुष्काळस्थितीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली, तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारांवर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, जिल्हाभरातील सर्वच १,९६० गावांची पैसेवारी ४६

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरिपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी काय जाहीर होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, यामध्ये गुरुवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच म्हणजे १,९६० गावांची ४६ पैसेवारी जाहीर केल्याने दुष्काळस्थितीवर शासनाची एकप्रकारे मोहर लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली, तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारांवर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडला नाही.   सरासरीपेक्षा जास्त पावसाने जमिनीत आर्द्रता व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीसोबत यंदा ८० टक्के कपाशीवर यंदा बोंडसडचे संकट उद्भवले त्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांनी कमी आलेली आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी कपाशी काढून रबीसाठी हरभऱ्याची पेरणी केल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे काही भागात तुरीवर ‘मर’रोगाचा प्रादुर्भाव झाला व आता शीतलहरमध्ये दवाळगेल्याने तूर जागेवरच सुकत असल्याने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व आठ प्रकारच्या सवलती मिळण्याच मार्ग मोकळा झालेला आहे.

बोंडसडमुळे २.१७ लाख हेक्टरमधील कपाशी बाधितयंदा पावसामुळे कपाशीवर बोंडसड, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये २,४४,००२ हेक्टर क्षेत्रापैकी २,१७,००१ हेक्टरमधील कपाशीचे ३३ टक्क्यावर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५,९९९ हेक्टर, भातकुली १४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,६०१, धारणी ९०, चिखलदरा १८५९, मोर्शी २९,८२६, वरुड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूरबाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी