शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची मागणी करणाऱ्या  एएसपीचे घर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 20:10 IST

गुन्ह्यातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात दोन लाखांची मागणी करणाऱ्या  सहायक पोलीस अधीक्षकासह अन्य एका जणाविरुद्ध नांदेड येथील अर्धापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देअमरावती एसीबीची नांदेडमध्ये कारवाई : दोन लाखांची मागितली होती लाच

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गुन्ह्यातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात दोन लाखांची मागणी करणाऱ्या  सहायक पोलीस अधीक्षकासह अन्य एका जणाविरुद्ध नांदेड येथील अर्धापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. या लाचेच्या मागणीची अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सहायक पोलीस अधीक्षक विजयकृष्ण यादव (३७, रा. इतवारा, नांदेड) याचा शोध सुरु केला असून, बुधवारी त्याचे नांदेड येथील घर सिल केले आहे.तक्रारकर्ता हा बिल्डींग मटेरियलचा व्यवसाय करीत असून, त्याच्यावर तिवसा (जि. अमरावती) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, ट्रक सोडविण्यासाठी तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल मोबादला म्हणून विजय यादवने तक्रारकर्त्याला दोन लाखांची मागणी केली होती. याबाबत अमरावती एसीबीच्या अधिकाºयांनी पंचासमक्ष प्रत्यक्ष पडताळणी केली असता, यादवने लाच मागितल्याचे निदर्शनास आले. या लाचेच्या रकमेतील पहिला टप्पा म्हणून एक लाख देण्याची मागणी केल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. ही लाचेची रक्कम त्याने मध्यस्थ सन्नीसिंग इंदरसिंग बुंगई (३४, रा. भगतसिंग रोड, नांदेड) याला स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार सापळा रचून एसीबीच्या अधिकाºयांनी सन्नीसिंग बुंगईला एक लाखाच्या लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. पोलिसांनी बुंगईला ताब्यात घेऊन अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा नोंदविला. सद्यस्थितीत आरोपी विजय यादव पसार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान अमरावती एसीबी पथकाने यादव याचे घर सील केले आहे.विजय यादव हा आयपीएसमूळ आंध्रप्रदेशातील विजयकृष्ण यादव याची २०१५ मध्ये यूपीएससीद्वारे निवड झाली. सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली. वाळू कंत्राटदाराविरुद्ध तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने आरोपीला अटक न करण्यासाठी, पकडलेले ट्रक सोडण्यासाठी व गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यास मदत केल्याबद्दल लाच मागितल्याचे उघड झाले आहे. ही घटना सहा महिन्यांपूर्वी घडली. त्यानंतर यादव प्रशिक्षणासाठी गेला होता. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर त्याचे नांदेडमधील इतवारा उपविभागात रुजू झाले. ही त्याची पहिली नियमित पोस्टिंग होती.आरोपी विजय यादव अद्याप हाती लागलेला नाही. त्याचे घर सील करण्यात आले असून, शोध सुरू आहे.श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, अमरावती एसीबी.

टॅग्स :PoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार