शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

५४ दुकाने सील; दोघांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:08 IST

स्थानिक जयस्तंभ चौक स्थित प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे थकित असणारी ५४ दुकाने सील करण्यात आली.

भाडे थकित : महापालिका बाजार परवाना विभागाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक जयस्तंभ चौक स्थित प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे थकित असणारी ५४ दुकाने सील करण्यात आली. महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने बुधवारी ही कारवाई केली. दरम्यान कारवाईत अडसर निर्माण करणाऱ्या चंदू लुल्ला व राजू नेभवाणी यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांमध्ये फौजदारी तक्रार करण्यात आली. निरीक्षक केशव ठाकरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे नोंदविले. आयुक्त हेमंत पवार यांनी कर थकित संकुलधारक, मालमत्ता धारकांकडून वसुली मोहिम आरंभली आहे. त्याअनुषंगाने बुधवारी महापालिका प्रशासनाच्या मालकीचे असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाची झाडाझडती घेण्यात आली. यात तब्बल ५४ दुकानदारांकडे लक्षावधीचा कर थकित असल्याचे वास्तव समोर आले. त्यापैकी काही संकुलधारकांनी परस्पर गाळे विकल्याचेही प्रकरण निदर्शनास आले आहे. पहिल्या टप्प्यात कर थकित असलेल्या गाळेधारकांचे दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. थकित कर वसूल होईस्तोवर दुकाने सील राहील, असे संकेत प्रशासनाने दिले आहे. ही कारवाई उापयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनात बाजार परवाना विभागाच्या अधीक्षक निवेदिता घार्गे, निरिक्षक केशव ठाकरे, आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, स्वप्नील महल्ले, अमर सिरवानी आदींनी केली आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी, यासाठी प्रियदर्शनी संकुलातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आयुक्त हेमंत पवार यांची सायंकाळच्या सुमारास भेट घेतली. मात्र पवार यांनी थकबाकी भरल्याशिवाय दुकानांचे सील उघडण्यात येणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. उशीरा सायंकाळपर्यंत या व्यावसायिकांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.