विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय : शिवसेनेचा आंदोलनाचा इशारातिवसा : शासन निर्णयानुसार तिवसा व भातकुली या दोन तालुक्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे पदनिर्माण करण्यात आले. मात्र, हे अधिकारी तिवसा या मुख्यालयी न थांबता भातकुली तहसील कार्यालयात उपलब्ध असतात त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत असल्याने शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दिनेश वानखडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, क्रिमीलेअर सर्टीफिकेट व अन्य प्रमाणपत्राची आवश्यकता आहे तसेच नागरिकांना देखील महसुली कामगाजासाठी नेहमी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे काम पडते. मात्र, तिवसा येथे उपविभागीय महसुल अधिकाऱ्याचे पद हे ४ वर्षापूर्वी निर्माण करण्यात आले आहे. व येथील प्रशासकीय भवनात या कार्यालयाचे निर्माण करण्यात आले आहे. मात्र, हे उपविभागीय अधिकारी तिवसा येथील कार्यालयात कधीच उपलब्ध राहत नाही.ते अमरावती येथील भातकुली तहसील कार्यालयात उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिकांची विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते. ही शासन आदेशाची अवहेलना आहे. त्यामुळे तिवसा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी तिवसा येथेच आठवड्यातून ३ दिवस उपलब्ध रहावे व उर्वरीत ३ दिवस भातकुली तालुक्यासाठी उपलब्ध रहावेत यामुळे दोन्ही तालुक्याची सोय होईल व या दोन्ही तालुक्यामधील विद्यार्थी व नागरिकांना कामे करणे सोयीचे होतील. या अनुषंगाने दिनेश वानखडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेवून निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन तिवसा येथे आठवड्यातून तीन दिवस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतरही शासन आदेशाची अवहेलना झाल्यास शिवसेना आपल्या पध्दतीने समाचार घेईल असे दिनेश वानखडे यांनी सांगितले.
तिवस्याचे एसडीओ मिळतात भातकुली तहसीलमध्ये
By admin | Updated: July 21, 2016 00:03 IST