शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पकारांची जन्मभूमी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:53 IST

शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.

ठळक मुद्देगाव दत्तक : विकासकामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : शिल्पकारांची जन्मभूमी अशी ओळख मिरविणाऱ्या टिमटाळ्याची शासनाने उपेक्षा केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी या गावात सुविधांची वानवा आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे गाव अडीच वर्षांपासून दत्तक घेतले होते. त्यासोबतच जनुना, जावरा, खिरसाना, निरसाना, अडगाव ही गावेसुद्धा दत्तक घेतली होती. तरीही या गावांचा विकास अद्यापही झाला नसल्याचे दिसून येत आहे. १९ नोव्हेंबर १९८४ रोजी महाराष्टÑ राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या टिमटाळा या गावात एकनाथ रानडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामकृष्ण रानडे हे टिमटाळा स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची बदली झाल्याने ते कुटुंबासह नागपूरला स्थायिक झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिल्प स्मारक त्यांनी उभारले. २ सप्टेंबर १९७० साली तत्कालीन राष्टÑपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पंतप्रधानांनी टिमटाळा या गावाची दत्तक ग्राम म्हणून निवड केली होती. तरी हे गाव अद्यापही विकास कामापासून कोसो दूर आहे. अडीच वर्षे उलटूनही घेतलेल्या दत्तक गावांचा विकास खोळंबला आहे. टिमटाळा गावात उद्योगधंदे, महिलांना उद्योग, वाचनालय, घरकुल सुविधा, शौचालय, संपूर्ण डांबरी रस्ते, सौंदर्यीकरण, एकनाथ रानडे यांचे स्मारक हे केंद्र शासनाच्यावतीने दत्तक ग्राम विकास योजनेच्यावतीने दोन वर्षात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही ही गावे विकास कामांपासून वंचित आहे. एकनाथ रानडे राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याने पंतप्रधानांनी टिमटाळा गाव दत्तक घेण्यासाठी पीयूष गोयल यांना पाठविले होते. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंद अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप यांच्याकडे दत्तक गावाच्या विकासाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकºयांचे गावाचा विकास केव्हा होणार, याकडे लक्ष लागले आहे.टिमटाळा, खिरसाना, निरसाना ही गावे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दत्तक घेतली असली तरी केंद्र शासनाने काम केलेच नाही. या गावांमधील घरकुल, शौचालयांची बांधकामे ग्रामपंचायतनेच केली.- लता भेंडेसरपंच, खिरसाना-निरसाना.