शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

स्क्रब टायफसची एन्ट्री; जिल्ह्यात अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:58 IST

डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना, ‘स्क्रब टायफस’ या नव्याच आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. कीटकांपासून माणसात संक्रमित होणाऱ्या या कीटकजन्य आजाराने नागपूरमध्ये पाच बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘अलर्ट’ घोषित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना, ‘स्क्रब टायफस’ या नव्याच आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. कीटकांपासून माणसात संक्रमित होणाऱ्या या कीटकजन्य आजाराने नागपूरमध्ये पाच बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘अलर्ट’ घोषित केला आहे. ग्रामीण भागात या रोगाचे पाच रुग्ण आढळले. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. उमेश नावाडे यांनी प्रतिबंधासाठी अधिनस्थ आरोग्य यंत्रणेला लेखी निर्देश दिले आहेत.हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग विभाग सहसंचालक व आरोग्य सेवा, अकोला उपसंचालकांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला सजगतेचे निर्देश दिले आहेत. गडचिरोली, नागपूर , अकोला, अमरावती, चंद्रपूर व जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले. या आजाराने हातपाय पसरण्यापूर्वी सर्वेक्षण, निदान व उपचार करावेत, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक, डीएचओ आणि महापालिकांच्या आरोग्य व्यवस्थेला मिळाले आहेत.आरोग्य सेवा उपसंचालकांचे निर्देश : ग्रामीण भागात पाच रुग्णकावीळ श्वसनाचा त्रासस्क्रब टायफस झालेल्या रुग्णांना कावीळ व श्वसनाचा त्रास होतो. ३५ टक्के रुग्णांना एआरडीएस (अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. ३० टक्के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळीच योग्य उपचार न झाल्यास ५० टक्के रुग्ण दगावतात. २५ टक्के रुग्णांना मेंदुविकार होतो. रक्त तपासणी आणि श्वसनाच्या लक्षणांवरून रोगनिदान करता येते.ही आहेत लक्षणे‘चिगर’ नामक कीटक चावल्यानंतर पाच ते २० दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, ओकाºया आणि इतर ज्वरासारखी लक्षणे असतात. त्यामुळे बºयाच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तविली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो, त्या ठिकाणी एक व्रण असतो. त्याला हशर म्हणतात. परंतु, ४० टक्के रुग्णांमध्ये हा हशर दिसत नाही. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, जनजागरण आणि उंदरांवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे.असा आहे उपचारडॉक्सिसायक्लिन अथवा अ‍ॅझिथ्रोमायसिनसारख्या अँटिबायोटिक्सच्या योग्य वापराने या आजारावर उपचार करता येत असल्याचेही आरोग्य सेवा सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.ही चाचणी उपयुक्तवेलफेलिक्स : रक्तचाचणी करून लक्षणानुसार आजाराचे निदान करता येणे शक्य आहे. टेट्रॅसायक्लिन्स आणि क्लोरोमकिनिकॉल या थेरपीनुसार रिक्टेशिअल आजाराचे निदान होते.विभागात स्क्रब टायफसचे १० पेैकी दोन रुग्ण कन्फर्म व आठ रुग्ण संशयित आहेत. यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे निर्देश दिलेत. अमरावती जिल्ह्यात तीन संशयित रुग्ण आहेत.- डॉ. अभिनव भुते, सहसंचालककरजगावच्या एका वृद्ध महिलेची स्क्रब टायफसची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह निघाली. त्यांचा रक्तनमुना मुंबई येथील मेट्रोपॉलिस लॅबला पाठविली आहे. अहवाल येईपर्यंत तो रुग्ण संशयित आहे.- डॉ. रोहिणी यादगिरे

टॅग्स :Healthआरोग्य