शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारला

By admin | Updated: October 18, 2014 00:46 IST

अत्याचारग्रस्त पीडित विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.

अमरावती : अत्याचारग्रस्त पीडित विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी मुख्याध्यापक व शिक्षिकेला बोलावून त्यांचे बयाण नोंदविले आहे.फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग झाला होता. याची तक्रार १७ जुलै २०१४ रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी दाखल करुन आरोपी सिध्दार्थ उत्तम गणवीरविरुध्द भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. अत्याचारानंतर पीडिता गर्भवती झाली. न्यायालयासमोर आरोपीला प्रस्तुत केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर पीडितेला प्रचंड यातनादायक प्रसंगांचा सामना करावा लागत होता.पीडितेला शाळेत प्रवेश नाकारल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना कळताच त्यांनी पीडिता व तिच्या आईसोबत चर्चा केली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला दुर्देवी घटनेनंतर शाळेत येण्यास मज्जाव केल्याचे मुलीने व तिच्या आईने घार्गे यांना सांगितले. अत्याचारग्रस्त मुलीसोबत अमानवीय व्यवहार करणाऱ्या मुख्याध्यापिकेला शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता पाचारण करून उपायुक्तांनी त्यांच्या समवेत चर्चा केली. तसेच त्यांचे बयाण नोंदविले. पीडित मुलीचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊन नये, तसेच तिला आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवावे आणि सन्मानजनक वागणूक द्यावी, अशा सूचना पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी मुख्याध्यापिकेला दिल्या आहेत. अत्याचार झालेल्या मुलीच्या वेदना कमी करण्यासाठी शाळा प्रशासनानेसुध्दा प्रयत्न करावेत, असेही घार्गे यांनी सांगितले.