शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणात स्कूल व्हॅनचालकाला पहाटे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:23 IST

आ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ साडेतीन वर्षीय चिमुकलीला धडक देणाऱ्या स्कूल व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली.

ठळक मुद्देराजापेठ पोलिसांची कारवाई : सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलची व्हॅन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ साडेतीन वर्षीय चिमुकलीला धडक देणाऱ्या स्कूल व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली.गोपालसिंग गौतम (६०, रा.रहाटगाव) असे आरोपी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी एमएच-२७ ए ९७३९ या क्रमांकाची सेन्ट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलची व्हॅन जप्त केली आहे.स्पीच थेरपीसाठी मयूरी कुळकर्णी यांच्या केंद्रावर आलेली आज्ञा प्रफुल्ल मंडळकर (रा. जळका शहापूर) या चिमुकलीला सोमवारी सायंकाळी एमएच २७ ए ९७३९ क्रमाकांच्या स्कूल व्हॅनने धडक दिली. घटनस्थळ आ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. अपघातानंतर गंभीर जखमी आज्ञाचा लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. एकुलत्या एक आज्ञाचा मृत्यू झाल्यामुळे मंडळकर कुटुंबीय शोकसागरात बुडाले. दरम्यान, अपघात घडविल्यानंतर चालक स्कूल व्हॅन घेऊन पसार झाला. पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर व शिपाई नितीन गावंडे आरोपी चालक गोपालसिंग गौतमचा शोध घेत होते. तो मंगळवारी पहाटे पोलिसांच्या हाती लागला. त्याला ठाण्यात आणून चौकशी केली असता, कठोरा नाका येथून बसस्थानक मार्गे तो रुक्मिणीनगर येथे शिकवणी वर्गातील मुले सोडण्यासाठी जात होता. यादरम्यान हा अपघात घडल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली आहे. आरोपी गोपालसिंगला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली आहे.अपघात प्रकरणातील स्कूल व्हॅनचालकास अटक करण्यात आली. व्हॅनसुद्धा जप्त केली आहे. पुढील चौकशी तपास अधिकारी करीत आहेत.- शशिकांत सातवपोलीस उपायुक्त