शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गावातील बेरोजगारांनी ग्रामपंचायतमध्ये सुरु केली शाळा

By admin | Updated: August 12, 2014 23:28 IST

मेळघाटात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला. चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सात पैकी पांच शिक्षक एक महिन्यापासून बेपत्ता आहेत.

नरेंद्र जावरे - अमरावतीमेळघाटात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला. चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सात पैकी पांच शिक्षक एक महिन्यापासून बेपत्ता आहेत. त्यामुळे संतप्त आदिवासींनी सोमवारपासून पाल्यांना शाळेत न पाठविता ग्राम पंचायत कार्यालयातच शाळा भरविली. तेथे गावातील डी.एड. बेरोजगार त्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. चिखलदरा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये चुरणी गावाचा समावेश आहे. येथे जिल्हा परिषदेतर्फे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या १४८ आहे. मुख्याध्यापकासह सहायक शिक्षकांची सात पदे मंजूर असून पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.गतवर्षीसुध्दा हाच प्रकार एक महिन्यापासून दोनच शिक्षक सात वर्ग व मुख्याध्यापकाचा पदभार सांभाळीत आहेत. परिणामी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन, समिती व पालकांनी चिखलदरा पंचायत समितीला वारंवार शिक्षकांच्या नेमणूकीचे निवेदन दिले. परंतु त्यावर सतत दुलर्क्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक महिन्यापासून शिक्षकांच्या नियुक्ति संदर्भात प्रशासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. परिणामी सोमवार पासून संतप्त पालकांनी जि.प. शाळेत पाल्यांना पाठविणे बंद केले व ग्राम पंचायत मध्ये शाळा भरविली. गावातील डीटीएड झालेले सुशिक्षित बेरोजगार राहुल येवले, आलोक अलोकार, सुमित चावरे, नागेश धोत्रे, संजय धुमावरे आदि विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. चुरणी शाळेत गतवर्षी सुद्धा बारा दिवस याच मुद्दावर शाळा बंद करण्यात आली होती.तेव्हा प्रतिनियुक्तिवर पाठविले होते. ते शिक्षक परत बोलविण्यात आले. त्यानंतर दिलेले शिक्षक तीन रजेवर तर मुख्याध्यापक निलंबित असल्याने हा प्रकार उघडकीस आले आहे. तर सुटीवरील गेलेल्या शिक्षकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.