शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिघी जहानपूर येथे शाळेत मटन पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:10 IST

तालुक्यातील दिघी जहानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी मटन पार्टीचा बेत आखून ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केला. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देशिक्षकांचा प्रताप : ३१ डिसेंबरला जल्लोष, पालकांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील दिघी जहानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी मटन पार्टीचा बेत आखून ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केला. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली आहे.दिघी येथील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. दोन शिक्षकांची नेमणूक येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिली ते पाचवीपर्यंत येथे फक्त सहाच विद्यार्थी शिक्षण घेतात. ३१ डिसेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मोहोळ व सहायक शिक्षक प्रेमदास गेठे यांनी शाळेत मटण सेवन केले आणि नंतर जेवणाची भांडी विद्यार्थ्यांना धुण्यास सांगितली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांचे जेवण व मद्यधुंद अवस्थेत असल्याची छबी कॅमेऱ्यांत कैद केली आणि पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी सुधीर अरबट व शिक्षणाधिकारी प्रशांत घाटे यांना हकिगत सांगितली. शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी संतप्त पालकांनी निवेदनातून केली. यावेळी रणजित बुधाळे, नीलेश डोंगरे, दीपक डोंगरे, पेठ जहानपूर येथील पोलीस पाटील मिलिंद सिरस्कार, प्रशांत सगणे, दिघी येथील पोलीस पाटील प्रमोद शिरसाट, संदीप नितनवरे, गजानन सगणे उपस्थित होते.मुख्याध्यापकांची कबुलीसदर प्रकरणाची माहिती होताच, शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट, विधानसभा प्रमुख रवि कोरडे, उपतालुकाप्रमुख गणेश ठाकरे, संदीप अरबट हे जिल्हा परिषद शाळेत धडकले. मुख्याध्यापकांनी शाळेत सामिष भोजन केल्याचे कबूल केले व सर्व पालकांची माफी मागितली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.सदर प्रकरणाची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाले आहे. गावातील काही नागरिक राजकारण करीत असल्याचे यावरून निदर्शनास आले. ५ जानेवारीनंतर प्रत्यक्ष चौकशी करून सदर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.- प्रशांत घाटे, गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, दर्यापूरशाळेतच मटण शिजविल्याचा प्रकार निंदनीय आहे. सदर प्रकरणासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. ज्या शिक्षकांनी असे कृत्य केले त्यांची त्वरित चौकशी केली करून दोषी शिक्षकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.- गजानन देवतळे, सभापती, पंचायत समिती, दर्यापूर