शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

योजना गरिबांची, लाभ मिळतो धनदांडग्यांना !

By admin | Updated: September 18, 2015 00:21 IST

शासन प्रशासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ हा गरिबांना नव्हे, तर धनदांडग्यांना मिळत आहे.

अन्याय : गरजू लाभार्थी वंचितच, रिपाइंचा आरोपअमरावती : शासन प्रशासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ हा गरिबांना नव्हे, तर धनदांडग्यांना मिळत आहे. या योजनांमध्ये सर्वेक्षण करुन खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात रिपाइंचे शहर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती तसेच निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार, आर्थिक दुर्बल घटकांसाठीचा अनुदान योजनेत अनियमितता होत असल्याचा आरोप केला. निराधारासाठी ही योजना १९८० सालापासून राबविण्यात येत होती. परंतु अलीकडील काळात योजनेच्या निकषात पूर्णपणे बदल करून देवदासी, परितक्त्या, तृतीयपंथियांचा समावेश करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व काही व्यक्तींनी केली आहे. मात्र याचा फायदा गरीबांना नव्हे तर धनदांडग्यांना होत आहे. योजनांचा वापर करून स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग होऊ लागल्याने खरेखुरे व गरजुवंत लाभार्थी मात्र वंचित राहू लागले असल्याचे रिपाइंचे म्हणणे आहे. सध्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजना आहे तर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ, अपंग आणि विधवा निवृत्ती वेतन योजना आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती, ८० टक्क्याहून जास्त अपंग, २१ हजाराच्या आतील उत्पन्न आणि मुलांचे वय वर्षाच्या आतील असल्यास यातील काही योजनांसाठी लाभार्थी पात्र होतो. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तलाठ्यांपासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवाय क्षेत्रीय मर्यादा न ठेवता प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार अधिकार देण्यात आले आहेत यात राजकीय दबाव वाढत आहे. (प्रतिनिधी)