शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

राजापेठ येथून बसफेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित

By admin | Updated: May 2, 2016 00:28 IST

विभागातील शहराअंतर्गत अमरावती ते बडनेरा मार्गावर राजापेठ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ....

अमरावती : विभागातील शहराअंतर्गत अमरावती ते बडनेरा मार्गावर राजापेठ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शाॅिप्ींग कॉम्प्लेस व बसस्थानकांहून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक आणि प्रवास भाडे निश्चित करण्यात आले आहे. या बसस्थानकाचे उद्घाटन नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे हस्ते करण्यात आले, हे विशेष.मध्यवर्ती बसस्थानक अमरावती येथून सुटणाऱ्या नागपूर, अकोला, यवतमाळ या मार्गावरील सर्व फेऱ्या राजापेठ या नवीन बसस्थानकावरून ये-जा करतील. परंतु नागपूरकडून येणाऱ्या व पुढे अकोलाकडे जाणाऱ्या फेऱ्या या मध्यवर्ती बसस्थानकाच्या मध्ये प्रवेश न करता स्थानकांबाहेर प्रवाशांना उतरुन थेट राजापेठ बसस्थानक येथे जातील व पुढे मार्गस्थ होतील. नागपूर मार्ग वर्ग होत असल्याने अंतर व प्रवासी भाड्यात होणारी तफावत स्पष्ट करण्यात आली आहे. यात नागपूरकडून येणारी व अमरावती येथे टर्मिनेट होणारी फेरी राजापेठ नवीन बसस्थानकांवर वर्ग होणार असल्याने फेरीच्या अंतरामध्ये २.२ कि. मी वाढ होऊन १५८.०३ कि. मी अंतर होईल. त्यामुळे राजापेठ येथे जाणाऱ्या व येथून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांस २६ टप्पे म्हणजेच २७ टप्प्याचे भाडे अदा करावे लागेल. परंतु नागपूरकडून येणाऱ्या व पुढे अकोला किंवा यवतमाळकडे जाणाऱ्या फेऱ्याच्या अंतरामध्ये बदल होणार नाही. त्यामुळे प्रवास भाड्यामध्येसुध्दा वाढ होणार नाही.अकोलाकडून येणारी आणि अमरावती मध्यवर्ती स्थानकांवर टर्मिनेट होणारी फेरी राजापेठ येथे वर्ग होणार असल्याने फेरीचे अंतर २.२ कि. मी ने कमी होवून ९६.१ कि. मी अंतर होईल. त्यामुळे अकोला ते राजापेठ स्थानक किंवा पुढे जाणाऱ्या प्रवाशांच्या अंतरामध्ये कमी येत असल्याने १७ टप्पे ऐवजी १६ टप्प्याचे भाडे आकारणी करावी लागेल. परंतु अकोलाकडून येणाऱ्या व नागपूर किंवा पुढे जाणाऱ्या फेऱ्यांच्या अंतरामध्ये बदल होत नाही. तसेच भाड्यामध्येसुध्दा वाढ होणार नाही.अमरावती विभागातील अमरावती - वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे आगाराच्या अमरावती मार्गे अकोला व पुढे जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्यांंच्या अंतरामध्ये बदल होणार नाही. परंतु राजापेठ येथून बसणाऱ्या व अकोला मार्गावर जाणाऱ्या प्रवाशाचे भाडे एक टप्याने कमी होणार आहे. तसेच राजापेठ येथे उतरणाऱ्या प्रवाशांचे सुध्दा भाडे एक टप्याने कमी होईल.यवतमाळकडून येणारी व मध्यवर्ती स्थानकांवर टर्मिनेट होईल. त्यामुळे फेरीच्या अंतरामध्ये २.२ कि. मी. कमी होवून अंतर होईल यवतमाळ ते राजापेठ स्थानक व राजापेठ स्थानक ते यवतमाळ किंवा पुढे जाणाऱ्या प्रवाशांच्या अंतरामध्ये कमी होत असल्याने १६ टप्पे ऐवजी १५ टप्पे भाडे द्यावे लागेल. परंतु यवतमाळकडून येणाऱ्या व नागपूर किंवा पुढे जाणाऱ्या फेऱ्यांच्या अंतरामध्ये व भाड्यामध्ये बदल होणार नाही.राजापेठ येथून बसणाऱ्या आणि यवतमाळ मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची भाडे एक टप्याने कमी होईल. राजापेठ बसस्थानकाहून प्रवाशांना ही सुविधा २५ एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे. अकोला आणि यवतमाळ मार्गावरील बहुतांश बस फेऱ्यांची वाहतूक मध्यवर्ती बसस्थानकांवर पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी ही बस वाहतूक राजापेठ येथील बस्थानकाहून सुरु करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)