शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘सरकार गँग’चे दणाणले धाबे

By admin | Updated: March 23, 2017 00:06 IST

गुंडगिरीत वर्चस्व निर्माण करणारी 'सरकार गँग' पोलिसांच्या हिसक्यामुळे नेस्तनाबूत झाली आहे.

गाड्यांवरील नाव काढले: नागरिकांना घेता येणार मोकळा श्वास अमरावती : गुंडगिरीत वर्चस्व निर्माण करणारी 'सरकार गँग' पोलिसांच्या हिसक्यामुळे नेस्तनाबूत झाली आहे. पोलिसांनी कठोर कारवाईचा फास आवळल्यानंतर सरकार गँगच्या म्होरक्यासह अन्य सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी त्यांच्या वाहनांवर अंकित केलेला 'सरकार' हा शब्द सुद्धा काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. रविनगरात दहशत पसरविणाऱ्या सरकार गँगने रंगपंचमीला पोलीस कर्मचारी राजू घुलेवर तलवारीने हल्ला केल्यानंतर राजापेठ पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप पसार आहेत. पोलीस चौकशीत सरकार गँगमध्ये तब्बल अठरा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १३ जणांची मंगळवारी पोलीस आयुक्तांसमोर पेशी झाली. त्यांनी गँगमधील तरूणांना समज दिला असून पुढे असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सरकार गँगचे सदस्य हे महाविद्यालयीन विद्यार्थी असून महाविद्यालयात टवाळखोरपणा करून इतर विद्यार्थ्यांवर दादागिरी करीत होते. सरकार गँगचे मुख्य सूत्रधार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेठीस धरून विद्यार्थ्यांमध्ये दबदबा निर्माण करीत होते. स्नेहसंमेलन असो किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम असो, अशाप्रसंगी हस्तक्षेप करून महाविद्यालयात वर्चस्व निर्माण करीत होते. विद्यार्थिंनींसोबत असभ्य वागणूक, छेडखानीचे प्रकारही होत होते. यागँगच्या सदस्यांजवळ देशी कट्टे असल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. लहान-सहान वादांमध्ये विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून सरकार गँगचे दबदबा निर्माण करीत होते. रविनगरात झालेल्या तांडवानंतर सरकार गँगचा पदार्फाश झाला असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला आहे. सरकार गँगमधील सदस्यांना पोलिसी खाक्या दाखविताच आता या गँगचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता सुटकेचा श्वास घेता येणार आहे. (प्रतिनिधी)शिवाजी मार्केटजवळ हुल्लडबाजीसरकार गँगचे बहुतांश सदस्य रविनगर चौकातील शिवाजी मार्केट परिसरात ठिय्या मांडून हुल्लडबाजी करतात. महागड्या दुचाकी घेऊन मार्केटच्या आवारात टवाळखोरी करण्यात ते माहिर आहेत. दुचाकीवर बसून त्यामार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना व महिलांची छेड काढण्याचे काम सरकार गँगचे सदस्य करीत होते. रविनगरजवळील एका नामांकित महाविद्यालयात तरुण-तरुणींची नेहमीच वर्दळ सुरु असते, अशावेळी सरकार गँगचे सदस्य मुलींवर लक्ष ठेऊन त्यांची छेड सुद्धा काढत असल्याचे प्रकार उघड झाले आहे. अनेकदा यामार्केट परिसरात झालेल्या वादात शस्त्रहल्ला झाल्याचीही एक घटना काही वर्षांपूर्वी घडली आहे. दीड महिन्यांत रोज लावावी लागणार हजेरीसरकार गँगच्या सर्व सदस्यांची मंगळवारी सीपींसमोर पेशी करण्यात आली असून त्यांना दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांने दिले. दीड महिने यासर्व सदस्यांना ठाण्यात हजर रहावे लागणार आहे.