शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताचा तुटवडा

By admin | Updated: August 30, 2014 01:06 IST

तालुक्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला असताना कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी युरिया खताची दामदुप्पट भावाने विक्री केल्याने शेतकरी चिंतातूूर झाला आहे.

दर्यापूर : तालुक्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला असताना कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी युरिया खताची दामदुप्पट भावाने विक्री केल्याने शेतकरी चिंतातूूर झाला आहे.मागील महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीचे आर्थिक नुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या असून आर्थिक संकटातून शेतकरीवर्ग सावरला नसताना जे काही पिके वाचली आहेत त्या पिकांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, पिकाला लागणारी रासायनिक खत शहरातील अनेक कृषिकंद्रांत तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, एकीकडे शेतकऱ्याला तुटवडा असल्याचे सांगायचे व दुसरीकडे २८५ रुपयांत मिळणारी रासायनिक खताची ५० किलोची बॅग ३५० रुपयांना विकायचे, असा प्रकार तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. रासायनिक खतांचा मोेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असून याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे. या कृषीसेवा केंद्रात नेहमी तपासणी होत नसल्याने हा प्रकार वाढीस लागला आहे. कृषी सेवा केंद्रात युरिया खताची खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. तालुक्यात ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुुकसान झाले असून नदीकाठची शेती खरडून गेल्याचा शासकीय अंदाज आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची गोची झाली असून अशा गरीब शेतकऱ्यांना वाजवी दरात रासायनिक खतांची खरेदी करणे शक्य नाही. जिल्ह्याच्या ठिकाणाहून खतांचा पुरवठा शक्य नसल्याने तुटवडा भासत असल्याचे कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काळाबाजार थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)