शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या २५ हजार लेकींची लघुउद्योगात भरारी

By admin | Updated: January 3, 2016 00:32 IST

नशिबाला संधीची गरज असते. ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात अधून- मधून डोकावते. याचा लाभ घेत जिल्ह्यातील ...

सामूहिक शेतीत पुढाकार : मुंबईच्या बाजारात अमरावतीतील बचत गटाच्या वस्तूंची मागणी मोहन राऊ त अमरावती नशिबाला संधीची गरज असते. ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात अधून- मधून डोकावते. याचा लाभ घेत जिल्ह्यातील सावित्रीच्या २५ हजार लेकींनी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगात भरारी घेतली आहे़ मुंबई-पुण्याच्या बाजारात आज बचत गटाने निर्माण केलेल्या विविध वस्तंूची मागणी वाढली आहे़ सामूहिक शेतीतही त्यांनी पुढाकार घेतला आहे़ अमरावती जिल्ह्यात १३ हजार ८२४ महिला बचत गट कार्यान्वित आहेत़ मागील पाच वर्षांत या बचत गटाने लघु उद्योगात यशस्वी पाऊल उचलले आहे़ शेळी मेंढी पालन, पापड उद्योग, दुग्ध व्यवसाय, खानावळ, बांबूपासून निर्मिती केलेल्या वस्तू, लाकडी बैलबंडी, अशा लघुउद्योगातून जिल्ह्यात एका वर्षात सात कोटींच्या घरात व्यवसाय करण्यात आला आहे़ ११ महिलांचा बचत गट असलेल्या एका गटाला प्रथम २५ हजार रूपये फिरता निधी देण्यात येतो. यात १० हजार रूपयांची सवलत, १५ हजार रूपये संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात भरावे लागते़ तद्नंतर बचतीच्या पाच ते आठ पट कर्ज देण्यात येते़ ५० हजार रूपये देण्यात येणाऱ्या या कर्जात शासनाची सवलत मिळते़ संबंधित कर्जाची परतफेड केल्यानंतर एक लाखाच्या वरील कर्ज संबंधित गटाला देण्यात येते़ आज या कर्जाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या संसारात आर्थिक हातभार लागत आहे, हे केवळ त्यांच्या शिक्षणाचे द्योतक आहे. वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव महिला बचत गटांची स्थापना ही केवळ बचत व कर्ज घेण्याएवढीच नसून जिल्ह्यातील आठ हजार महिला बचत गटांनी लघु उद्योगात व्यक्तिगत कौशल्याला महत्त्व दिले आहे़ वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती, परिस्थिती हाताळण्याची कला व यशस्वी होण्याची क्षमता, नेतृत्व गुण चोख व्यवहार यामुळे हे महिला बचत गट यशस्वी ठरले आहे़ सामूहिक शेतीत पुढाकार शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या काही महिलांनी आपला बचत गट तयार करून सामूहिक शेती मागील चार वर्षांपूर्वी सुरू केली़ या सामूहिक शेतीतून सोयाबीन, कपाशी, गहू, हरभरा पिकेच नव्हे, तर थेट भाजीपाला तसेच विविध उत्पन्न काढून दीडशे महिला बचत गट आघाडीवर आहेत़ धामणगावच्या बचत गटांची मुंबई वारी धामणगाव रेल्वे तालुक्यात आठ वर्षांपासून खानावळ व्यवसाय सांभाळणाऱ्या तळेगाव दशासर येथील रमाई महिला बचत गट व मेणबत्यापासून विविध वस्तू तयार करीत असलेल्या जळका पटाच्या येथील भिमाई महिला बचत गटाने मुंबईत भरारी घेतली़ मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनीमध्ये या गटाची निवड विस्तार अधिकारी मिलिंद ठुणुकले यांच्या मार्गदर्शनाने झाली आहे़ निर्णयाचे होते पालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अहमद यांनी जिल्ह्यातील काही महिला बचत गटांच्या सभेच्या वृत्ताचे वाचन केले़ यात वेळेवर सभा घेणे, सभेत विषय मांडणे, त्यावर चर्चा करणे इतिवृत्तांत लिहिणे, हिशोबाच्या वह्या व्यवस्थित ठेवणे, गटाच्या निर्णयाचे पालन करणे, बैठकीची पूर्वतयारी करणे, विषय पत्रिका लिहिणे या सर्व बाबी अत्यंत पारदर्शकपणे महिला बचत गट करीत असल्याचे पाहावयास मिळाले़ जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या विकास गंगोत्रीमधून महिला बचत गटाच्या विविध लघु उद्योगांना उभारी मिळते़ पंचायत समितीचे मार्गदर्शन व बँकेचे सहकार्य तसेच महिलांमध्ये आपला बचत गट आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची असलेली जिद्द त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी लघुउद्योगात भरारी घेतली आहे़ - प्रमोद कापडे, प्रभारी संचालक, जिल्हा ग्रामीण विकास.