सावित्रीच्या लेकींची भरारी... ‘आज मैं उपर आसमां नीचे...आज मैं आगे जमाना है पीछे..’ काहीशी अशीच अवस्था सावित्रीच्या लेकींची झाली आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. बारावीत ९०.५० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या ८३.४६ टक्केवारीच्या तुलनेत ही टक्केवारी अधिक आहे. मागील काही वर्षांपासून दहावी-बारावीच्या निकालात मुलींचाच वरचष्मा पाहायला मिळतो. निकाल जाहीर झाल्यानंतर परिश्रमपूर्वक मिळालेल्या यशाने आनंदित होऊन या विद्यार्थिनींनी असा जल्लोष केला. जिल्ह्याच्याच नव्हे तर विभागाच्या निकालावरही मुलींचाच प्रभाव आहे.
सावित्रीच्या लेकींची भरारी...
By admin | Updated: May 26, 2016 01:15 IST