शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरिट वाचवा, देश वाचवा’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:38 IST

उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांचा ‘दांडी मार्च’मध्ये सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे. ‘मेरिट वाचवा देश वाचवा’ आंदोलनातून लक्ष वेधत सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येत बुधवारी आंदोलन छेडले. नेहरू मैदानातून बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान शांततेत दांडी मार्च काढून यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन दिले.गठ्ठा मतांच्या लोभातून १० वर्षांसाठी लागू केलेले आरक्षण स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कायम आहे. प्रत्येक सत्ताधाºयाने त्यात भर घालत खुल्या वर्गासाठी जेमतेम पाच टक्के जागा ठेवल्या आहेत. दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला, त्यावेळी तेथे आरक्षणाविषयी सूचविण्यात आले. मात्र, नेल्सन मंडेला यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. बांग्लादेशात कडाडून विरोध झाल्याने सरकारी नोकºयांतील आरक्षण रद्द झाले. तथापि, आपल्याकडे सत्ताधाºयांची ही गरज बनली आहे. यामुळे ९८ टक्के गुण घेऊनही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही, तर ४० टक्के गुण घेणारा आरक्षणाच्या बळावर तरून जातो. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? सर्व शैक्षणिक शाखा व शासकीय नोकºयांमध्ये अतिआरक्षणामुळे गुणवत्ता व प्रतिभा डावलली जात असल्याने अतिआरक्षण विरोधी एकता मंचने उभारलेल्या ‘मेरिट वाचवा देश वाचवा’ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. नेहरु मैदान ते इर्विन चौकापर्यंत दांडी मार्च काढण्यात आला. यावेळी डॉक्टर, इंजिनिअर, सीए, व्यापारी आदी क्षेत्रातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या आहेत मागण्याराज्य सरकारने वाढविलेले आरक्षण तत्काळ रद्द करण्यात यावे, इयरमार्किंग पद्धत बंद करावी. आरक्षण विनाअट नसावे. शासनाने ५० लाखांचा बाँड द्यावा व त्याच्या बदल्यात दुर्गम भागात पाच वर्षे सेवेची अट ठेवावी. पदव्युत्तर प्रवेशासाठी आरक्षण असूच नये, आरक्षण केवळ शासकीय महाविद्यालयांमध्येच असावे. त्यामुळे खासगी संस्थांना कररूपी डोनेशन वाचेल. शिक्षण वा नोकरीत आरक्षण एकदाच मिळावे. बढत्यांमध्ये आरक्षण असू नये. आर्थिक निकषांसह सशर्त आरक्षण असावे. यामुळे जातिभेद नष्ट होण्यास मदत मिळेल. अशा अनेक प्रकारच्या मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या.