शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सावर्डीची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल

By admin | Updated: January 11, 2016 00:14 IST

स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे.

समितीने केली पाहणी : तालुक्यातील एकमेव गावनांदगाव पेठ : स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे. राज्यस्तरीय समितीने केलेल्या पाहणीतून सकारात्मक निकाल येण्याची चिन्हे आहे. शुक्रवारी राज्यस्तरीय हागणदारीमुक्त समिती सकाळी १० वाजताच सावर्डीला पोहोचली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन करून समितीने संपूर्ण गावाची तपासणी केली. पथकाचे प्रमुख गजानन काकड, बी. एम. बोरडे, नीलेश नागपूरकर, धनंजय तिरमारे, विस्तार अधिकारी देशमुख यांनी तपासणीच्या व पडताळणीच्या अनुषंगाने शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैयक्तिक शौचालय सांडपाणी व घनकचरा याबाबत गावफेरीतून संपूर्ण माहिती घेतली व गावकऱ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. समितीने याबाबत सरपंच राहुल उके व गावकऱ्यांचे भरभरून कौतुक केले. एकंदरीत स्वच्छ भारत मिशनमध्ये सावर्डीने स्थान मिळविले असून दिल्ली येथील पथकाच्या तपासणीनंतर सावर्डी गाव हागणदारीमुक्त घोषित करण्यात येईल. राज्यस्तरीय समितीने हिरवी झेंडी दिली आता शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण होईल. यावेळी पथकासोबतच उपसरपंच नलिनी मेश्राम, ग्रामसेविका स्वाती कांडलकर, रिता मेश्राम, चंद्रभान गोंडाने, सयाबाई मेश्राम, राधा मेश्राम, सावित्रीबाई मेटांगे, पो. पा. नरेंद्र मेश्राम, रिहान खाँन, माणिक खोब्रागडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)सरपंचपदाचे सूत्र हाती घेतल्यापासून सावर्डीचा विकास हेच ध्येय असल्याने पहिल्याच दिवसापासून स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण हागणदारी नष्ट केली. आज प्रत्येकाच्याच घरी शासन योजनेचे शौचालये आहेत. त्यामुळे उशीरा का होईना आमच्या परिश्रमाचे हे फलितच आहे.- राहुल उके, सरपंच, सावर्डी.