एकझिरा गावातील लोकांना दिवाळीनंतर मग्रारोहयोअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे स्थलांतर वाढले. त्यामध्ये गर्भवती आणि स्तनदा महिलांचा समावेश आहे. ० ते ६ वर्षांपर्यंतच्या २७ बालकांचा स्थलांतरितांमध्ये समावेश आहे. तर सोनापूर गावातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वर्षापर्यंतची २० बालके आपल्या आईवडिलांसोबत गेली आहेत. या दोन्ही गावात पिण्याच्या पाण्याचीसुद्धा भीषण समस्या असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याचे स्वछ पाणी मिळावे, याकरिता प्रशासनाने कायमस्वरूपी योजना करायची मागणी करीत लालमन, मोतीराम, हिरामण, चंपालाल, सोनाकलाल, शेषराव, सुनील, सज्जू, गोपाल, शोभेराम, रामबाबू, नामदेव यांनी दिला आहे.
-------