शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाईटने संरक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:56 IST

रेल्वेस्थानक परिसर व खुल्या जागांवर वाढते अतिक्रमणावर सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे. दरम्यान रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा बल कुचकामी ठरल्याचा अभिप्राय वरिष्ठांनी नोंदविला आहे. अमरावती व बडनेरा येथील रेल्वे मालमत्तांचे येत्या वर्षात सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानक, खुल्या जागांवर नजरअतिक्रमण रोखण्यासाठी नवी संकल्पना

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेल्वेस्थानक परिसर व खुल्या जागांवर वाढते अतिक्रमणावर सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे. दरम्यान रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा बल कुचकामी ठरल्याचा अभिप्राय वरिष्ठांनी नोंदविला आहे. अमरावती व बडनेरा येथील रेल्वे मालमत्तांचे येत्या वर्षात सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे.रेल्वे प्रशासनाकडे मोठ्या संख्येने खुले भूखंड असून, त्यांची देखभाल, संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे रेल्वेने ईस्त्रोसोबत मालमत्तांचे उपग्रहाद्वारे नियंत्रण ठेवण्यासंदर्भात करार केला आहे. काही महिन्यांत रेल्वेस्थानक, खुले भूखंड, कर्मचारी वसाहती, विश्रामगृह, अधिकाऱ्यांचे बंगले आदी मालमत्तांबाबतची नोंद उपग्रहाच्या नियंत्रण यंत्रणेत केली जाणार आहे. रेल्वे मालमत्तांच्या चोरीच्या घटना वारंवार होत असून, यावर कुणाचेही अंकुश नाही. त्यामुळे मुंबई मध्य रेल्वे विभागातंर्गत पाचही विभागात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षातून रेल्वेचे अधिकारी सर्व मालमत्तांची माहिती प्रमुख नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देतील. त्यानंतर मुख्य नियंत्रण केंद्रातून ईस्त्रोला पाठविण्यात येईल, जेथे संबंधित स्थानकांची नोंद उपग्रहाच्या नियंत्रण यंत्रणेत केली जाणार आहे. रेल्वेच्या सर्व मालमत्तांंचा आराखडा तयार केल्यानंतर जीआयएस पोर्टल विकसित केले जाईल. हे पोर्टल पूर्णपणे जीपीएस प्रणालीवर आधारित असणार आहे. या पोर्टलसाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हे पोर्टल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पोर्टलसाठी सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) नव्या एप्लिकेशनची निर्मिती केली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने मालमत्तांची देखरेख यंत्रणा बळकट करण्याचे दिशानिर्देश दिले आहे.उपग्रहांद्वारे २४ मालमत्तांवर असेल लक्षरेल्वेस्थानक, मालमत्तांचे मॅपिंगच्या हिशेबाने उपग्रहात चिन्हांकित स्थान अपलोड केले जाईल. त्यामुळे २४ तास अशा स्थानांवर नजर ठेवली जाणार असून, रेल्वेस्थानकांचादेखील यात समावेश असणार आहे. अतिक्रमण होताना दिसून आल्यास केंद्रातून ही माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिली जाणार आहे.बडनेऱ्यात अतिक्रमणाची मोठी समस्याबडनेरा रेल्वे हद्दीत अतिक्रमण झाले असून, ही समस्या गंभीर आहे. माताफैल, पाचबंगला, स्विपर कॉलनी, कांशीराम चाळ परिसर, रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार आदी भागात घरे, झोपड्या निर्माण करण्यात आल्याची माहिती आहे. प्रवेशद्वाराला अतिक्रमणाचा वेढा असून ते हटविण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवीत नाही.रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाईटने नजर असणार, ही बाब प्रशासनासाठी अतिशय चांगली आहे. रेल्वेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण ही समस्या गंभीर असून, आता वरिष्ठांकडून याप्रकरणी दखल घेतल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने ही समस्या दूर करता येईल.- आर.टी. कोटांगळे,प्रबंधक, अमरावती रेल्वेस्थानक