शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच-उपसरपंचात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:23 IST

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवल्याचा वाद सोमवारी वलगाव ग्रामपंचायत येथील आमसभेत उफाळून आला. यात महिला सरपंच व उपसरपंचात हाणामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी उपसरंपचाविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली.

ठळक मुद्देवलगाव ग्रामपंचायतीत तोडफोड : आमसभेत गोंधळ, टायर जाळून रास्ता रोकोचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवल्याचा वाद सोमवारी वलगाव ग्रामपंचायत येथील आमसभेत उफाळून आला. यात महिला सरपंच व उपसरपंचात हाणामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी उपसरंपचाविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली.वलगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारीच्या निवडीवरून ग्रामपंचायतीत सरपंच मोहिनी विठ्ठल मोहोड (४०) व उपसरपंच महेश गुलाबराव उकटे (४७) यांच्यात सोमवारी आमसभेत हाणामारी झाली. सोमवारी सकाळी ११ वाजता आमसभेत विविध विषयावर चर्चा सुरू असताना सरपंच मोहिनी मोहोड यांनी कृष्णराव तायडे यांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला. तायडे हे ग्रामपंचायत येथे वीज कर्मचारी पदावर कार्यरत होते. परंतु ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने गावातील पथदिव्याचे काम रखडले होते. त्यामुळे सरपंच मोहिनी मोहोड यांनी तायडे यांची रोजंदारीवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. परंतु उपसरपंच उकटे यांनी तायडेच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मोहोड व उकटे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीतही झाले. शिवीगाळ आणि भांडणाने ग्रामपंचायत कार्यालय दणाणून गेले होते. याप्रकरणी सरपंच मोहीम मोहोड यांनी तत्काळ वलगाव पोलीस ठाणे गाठून उपसरपंचांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ग्रामपंचायतीत झालेल्या या हाणामारीच्या घटनेमुळे वलगावातील वातावरण तापले होते.उपसरपंचाच्या अटकेची मागणीउपसरपंचांना त्वरित अटक करा, अशी मागणी करीत सरपंच यांच्या शेकडो समर्थकांनी वलगाव बस स्थानककासमोर टायर जाळून चक्क जाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्त्यावर टायर जाळल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अचानक झालेल्या जाळपोळीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली.३० जणांवर गुन्हाटायर जाळल्याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर उपसरपंच यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्यांनी तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.पोलिसांनी केले दुकान बंदग्रामपंचायतील वादानंतर सरपंच यांच्या समर्थकांनी रस्त्यावर चक्काजामचा प्रयत्न केला. वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. नागरिकांचा रोष पाहता, काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. अप्रिय घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी दुकाने बंद केलीग्रामपंचायत सभेत सरपंच व उपसरपंचात वाद झाला. महिला सरपंचाच्या तक्रारीवरून उपसरपंचाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. टायर जाळणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली असून वलगावात शांततापूर्ण वातावरण आहे.यशवंत सोळंके,पोलीस उपायुक्त