शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच अवॉर्डच्या प्रवेशिकांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:31 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा तथा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’: १५ जानेवारीपर्यंत प्रस्तावांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा तथा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरू केला आहे. गतवर्षी अठरा जिल्ह्यांत ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारांहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़ सरपंचांनी विविध १३ क्षेत्रांत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रात अगोदर जिल्हा व नंतर राज्य स्तरावर आदर्श सरपंचाची निवड करण्यात आली होती. गतवर्षी विजेत्यांच्या गावांसाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या होत्या. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क करावा.पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उद्योन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर अशा १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे, त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. प्रवेशिका ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.पुरस्कारासाठीची प्रक्रिया‘लोकमत’ कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या जातील.सरपंचांनी या प्रवेशिका भरून पुन्हा कार्यालयात जमा करावयाच्या आहेत.प्रवेशिकांची छाननी करुन व माहितीची पडताळणी करुन ‘ज्युरी’ (मंडळ) जिल्हा पातळीवरील पुरस्कारांची घोषणा करेल.प्रथम जिल्हास्तरावर १३ पुरस्कार दिले जातील. त्यानंतर राज्यस्तरीय सोहळ्यात राज्याचे १३ पुरस्कार प्रदान होतील.अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.