परतवाडा : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून ७ सप्टेंबर रोजी ठाणेदार जमील शेख यांनी धाड टाकली. या ठिकाणाहून जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सरमसपुरा पोलिसांनी भूगाव येथे आदर्श शाळेच्या मागील बाजूला खुल्या जागेत धाड टाकली. येथून नीलेश उमेश मोहोड (३०), पांडुरंग देविदास वानखडे (४४), सागर विश्वनाथ वानखडे (२०), चेतन सुधाकर वानखडे (२०), रघुनाथ विश्वनाथ ताय़डे (५८), सागर रमेश कडू (३०), मोहन ज्ञानेश्वर लांदे (४०), उमेश कैलास इंगळे (४०), रमेश निलेश चक्रे (२८), रामराव जानराव तायडे (५०, सर्व रा. भूगाव, ता. अचलपूर) यांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण ३८०० रुपये, १० हजारांचा मोबाईल, डावातील ३५० रुपये तसेच एमएच २७ सीआर २०५२ क्रमांकाच्या दुचाकीसह ६४ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
भूगाव येथेच अन्य ठिकाणी बाळासाहेब बाबाराव धुळे (४१), विनोद प्रल्हादराव धुळे (३८), सिद्धार्थ अरुण वनखडे (२५), राजेश प्रल्हादराव धुळे (३५), अतुल ज्योतीराव वानखडे (४४), भारत भीमराव वानखडे (३७), सागर सुरेश वानखडे (३०, सर्व रा. भूगाव) यांना जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख २५८० रुपये, २३ हजारांचे तीन मोबाईल, एमएच २२ एबी १८९५ क्रमांकाची दुचाकी असा ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार जमील शेख यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहायक उपनिरीक्षक दत्ता खांडेकर, पोलीस नायक आशुतोष तिवारी, कॉन्स्टेबल सिद्धांत ढोले, पंकज ठाकरे, घनश्याम किरोले, सचिन कोकणे, प्रीती हटवार यांनी केली.