अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सपन प्रकल्प शंभर टक्के भरला. यावर्षी शंभर टक्के भरणारा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प. याचा आनंद अधिकाऱ्यांनी गुरुवारी कार्यालयात ‘केक’ कापून व्यक्त केला.केकवर ‘सपन प्रकल्प, शंभर टक्के’ असे अंकित होते. आकर्षक रंगसंगतीतील हा केक नवीन लघू पाटबंधारे उपविभाग अचलपूरच्या कार्यालयात आणला गेला. कापलेला केक एकमेकांना भरवला. केक कापण्याचा व भरवण्याचा सपन प्रकल्पाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग ठरला.अपवाद वगळता सपन मध्यम प्रकल्प दरवर्षीच शंभर टक्के भरला आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, अप्पर वर्धा धरणेही शंभर टक्के भरली तरी आजपर्यंत कुणी केक कापून आनंदोत्सव साजरा केलेला नाही. धरण भरल्यानंतर प्रकल्पस्थळी जलपूजनाचा प्रघात आहे. दरम्यान सपन धरण शंभर टक्के भरल्यामुळे अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे लगतच्या गोंडविहीर तलावात ४ आॅक्टोबरपासून सोडण्यात येत आहे. या पाण्याने गोंडविहीर तलाव भरणे अपेक्षित आहे. २०११ पासून सपन प्रकल्प शंभर टक्के भरला जात आहे. पण, आजपावेतो दहा टक्केही सिंचन नाही. धरणाची सिंचन क्षमता सहा हजार हेक्टर आहे.
सपन प्रकल्प १००% केक कापून हर्षोल्हास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 21:54 IST
सपन प्रकल्प शंभर टक्के भरला. यावर्षी शंभर टक्के भरणारा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प. याचा आनंद अधिकाऱ्यांनी गुरुवारी कार्यालयात ‘केक’ कापून व्यक्त केला.
सपन प्रकल्प १००% केक कापून हर्षोल्हास
ठळक मुद्देपहिल्यांदाच उपक्रम : विसर्गाने गोंडविहीर तलाव भरणार