शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २७ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 11:25 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी २७ कर्मचाऱ्यांना दिलेल्या पदोन्नतीवर शासनाने आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देशासनाने मागविला अहवाल न्यायप्रविष्ट प्रकरणानंतरही पदोन्नतीची लगीनघाई कशाला?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी २७ कर्मचाऱ्यांना दिलेल्या पदोन्नतीवर शासनाने आक्षेप घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पदोन्नतीची घाई कशाला, असा सवाल उच्च शिक्षण विभागाने पत्रातून उपस्थित केला आहे. याप्रकरणी शासनाने वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे.विद्यापीठाने वर्ग ४ ते वर्ग ३ आणि वर्ग ३ ते वरिष्ठ लिपिक अशी २७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत वेतनवाढ लागू केली. उच्च शिक्षण विभागाने २२ नोव्हेंबर २०११ रोजीचा कर्मचारी पदोन्नतीबाबतचा शासनादेश रद्द केला. याच शासनादेशानुसार २७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. तथापि, १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासनादेशानुसार नवीन पदोन्नती नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचा आक्षेप शासनाने घेतला आहे.विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाने याबाबत अंतरिम आदेश देताना कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करू नये, असे म्हटले. मात्र, विद्यापीठाने अंतरिम आदेशाचे पालन न करता कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाने पदोन्नतीवर आक्षेप घेतला. त्यामुळे विद्यापीठाकडून शासनाला पाठविल्या जाणाऱ्या पदोन्नतीबाबतच्या अहवालात नेमक्या कोणत्या बाबीचा समावेश केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.रिक्त पदांची मोठी समस्याविद्यापीठात अधिकारी, कर्मचारी दरमहा सेवानिवृत्त होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रिक्त पदांची मोठी समस्या विद्यापीठासमोर उभी ठाकली आहे. रिक्त पदांमुळे दैनंदिन कामे विस्कळीत होत असल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत. शासनाने विद्यापीठात नवीन पदभरतीला ब्रेक लावला आहे. सहा विद्यापीठांमध्ये कर्मचारी पदोन्नती प्रकरण गाजत असतानाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.पदोन्नती ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली. यापूर्वी न्यायालयाने अंतरिम आदेश दिले असून, त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली. न्यायालयाच्या कर्मचारी पदोन्नतीबाबत अंतिम निर्णय ग्राह्य असेल.- प्रवीण राठोड,उपकुलसचिव, सामान्य प्रशासन विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र