मनीष गवई यांचा पाठपुरावा, सिनेट सभेत मांडला होता प्रस्ताव, यावर्षीपासून मिळणार बेस्ट कॅडेट अवॉर्ड
अमरावती : राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसी हा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय, च्यावतीने देशाच्या युवा सबलीकरण, व्यक्तिमत्त्व, विकासासाठी चालविला जाणारा एक सक्रिय कार्यक्रम आहे ज्यातून विध्यार्थ्यांना सैन्य शिस्तीचे व एकात्मतेचे धडे दिले जातात. संत गाडगे बाबा अमरावती अमरावती विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट कॅडेट अवॉर्ड सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई यांनी याबाबत सिनेट सभेत मांडला होता. या प्रस्तावाला हिरवी झेंडी देत तो जशाचातसा मान्य केल्यामुळे मनीष गवई यांच्या अथक प्रयासाने विद्यापीठाचे राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट कॅडेट अवॉर्ड सुरु होणार आहे.आता बटालियन मधून येणाऱ्या विध्यार्थ्यांला बेस्ट कॅडेट अवॉर्ड दिल्या जाणार आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयातील एनसीसीच्या स्वयंसेवकाना त्याचा लाभ मिळणार आहे. या महत्वपूर्ण प्रस्तावासाठी गवई यांचे विध्यार्थी संघटनांच्यावतीने विशेष अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणजे अशा प्रकारची योजना सुरु करणारे संत गाडगे बाबा अमरावती अमरावती विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरणार आहे
विद्यार्थ्याच्या आयुष्यातल्या सामाजिक कार्यामुळेच त्यांच्यात समाजसेवा किंवा राष्ट्रीय सेवेचे गुण विकसित होतात. ‘एकता व अनुशासन’असं ब्रीदवाक्य असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसी चे स्वयंसेवक देशहितासाठी विशेष सेवा देत असतात. एनसीसी हा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्यावतीने चालविला जाणारा एक सक्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात भाग घेणारे विद्यार्थी, समाजातील लोकांसह, साक्षरतेशी संबंधित कार्य, पर्यावरण संरक्षण, आरोग्य व स्वच्छता, आपत्कालीन परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडित लोकांना मदत, सैन्य शिस्तीचे व एकात्मतेचे धडे इ. महत्वपूर्ण कार्य करतात. राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मतेबाबत जनजागृती करून समाजाला सशक्त करण्याचे महत्त्वाचे कार्य देखील केले आहे. त्याचा फायदा समाजाला झालेला आहे. राष्ट्रीय छात्र सेनेची अशी कुठलीच स्वतंत्र पुरस्कार योजना नाही. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेननेच्या स्वयंसेवकांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागत होते. अमरावती विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठाच्यावतीने एनसीसी बेस्ट कॅडेट अवॉर्ड योजना अस्तित्वात नव्हती उलट एनसीसी पथकांची संख्या वाढत जात होती. अशा स्थितीमध्ये छात्र सैनिकांना संधी मिळत नव्हती ही बाब लक्षात घेता राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई यांनी याबाबत नुकत्याच संपन्न झालेलया बजेटच्या अधिसभेत प्रस्ताव मांडला. सिनेट सभेने हा या प्रस्तावाला हिरवी झेंडी देत तो जशाचातसा मान्य केल्यामुळे आता डॉ.मनीष गवई यांच्या अथक प्रयासाने विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांमधून बेस्ट कॅडेट अवॉर्ड सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या विध्यार्थी विकास विभागाला हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून ही योजना आगामी सत्रापासून लागू करण्यात येणार आहे. आता एन.एस.एस प्रमाणे एनसीसीच्या छात्र सैनिकांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार असल्याने विधार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा सन्मान राष्ट्रीय छात्र सेनेच्या दिवसानिमित्त देण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे राष्ट्रीय छात्र सेनेच्या सामाजिक चळवळीला बळकटी मिळणार आहे. या पूर्वी देखील डॉ.मनीष गवई यांच्या यांच्या पुढाकाराने एन.एस.एसच्या पुरस्कार संख्येत वाढ करण्यात आली होती हे विशेष. विध्यार्थी हिताच्या या विशेष प्रस्तावासाठी कुलगुरूंनी देखील डॉ.मनीष गवई यांचे अधिसभेत अभिनंदन केले. विशेष म्हणजे अशा प्रकारची योजना ही कुठल्याही विद्यापीठात अस्तित्वात नसल्याने ठरणार आहे अशा प्रकारची योजना सुरु करणारे संत गाडगे बाबा अमरावती अमरावती विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरणार आहे.