शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

अंजनगाव बाजार समितीच्या सभापतीपदी संजय रोहणकर

By admin | Updated: September 22, 2015 00:20 IST

स्थानिक बाजार समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे संजय रोहणकर सभापतीपदी व शामसुंदर गायगोले उपसभापतीपदी प्रत्येकी तेरा मतांनी विजयी झालेत.

निवडणूक : परिवर्तनच्या हाती सत्ता, नवख्यांना संधी अंजनगावसुर्जी : स्थानिक बाजार समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे संजय रोहणकर सभापतीपदी व शामसुंदर गायगोले उपसभापतीपदी प्रत्येकी तेरा मतांनी विजयी झालेत. त्यांच्या विरोधात सहकार पॅनेलच्या संचालकांनी तक्रार केली होती. पण निवडणूक अधिकारी बलिंगे यांनी ती फेटाळून लावली. व्यापारी मतदार संघाचे दोन व हमाल मतदारसंघाच्या एका संचालकानेसुध्दा हात वर करुन परिवर्तन पॅनेला खुला पाठिंबा घोषित केला. हे या निवडणुकीचे वैशिष्ट राहिले. परिवर्तन पॅनेलमध्ये सभापतीपदासाठी बंडखोरी होईल, हा अंदाज सपेशल खोटा ठरला. आपल्याला हे पद मिळावे, असे बहुमतातील गटात असलेल्या संचालकांना वाटणे साहजिकच होते. पण ज्या पद्धतीने हा विजय प्राप्त झाला, त्यानुसार व मतदारांच्या भावनांना लक्षात घेऊन परिवर्तन पॅनेलच्या संचालकांनी आपला गट बंडखोरीपासून अलिप्त ठेवला. शेवटपर्यंत या गटाला छेद देण्याचे अनेक प्रयत्न झालेत. गुप्त मतदान मागण्याची मागणी हा त्यातलाच एक भाग होता. सभापती निर्वाचित झालेले संजय रोहणकर हे अडगाव खाडे येथील सरपंचसुध्दा आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातूून ते विजयी झाले होते. शामसुंदर गायगोले हे युवक काँग्रेसचे राज्य पदाधिकारी असून वनोजाबाग येथील रहिवासी आहेत. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या रुपाने बाजार समितीला उमदे युवा नेतृत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या हाती सत्ता देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)