शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली तालुक्यात वाळू वाहतूक बिनबोभाट!

By admin | Updated: December 27, 2015 00:37 IST

तहसीलदाराच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही वाळू चोरट्यांचा हैदोस सुरू आहे.

वाहतुकीसोबत चोरीही : महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्षअमरावती : तहसीलदाराच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही वाळू चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. भातकुली तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीच्या पात्रातून वाळूचे उत्खनन सुरू असताना तस्करांचे चांगलेच फावले आहे. भातकुली तालुक्यातील एकाही वाळूघाटाचा अद्यापपर्यंत लिलाव झालेला नाही. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वदूर व शहराच्या कानाकोपऱ्यात पेढी नदी व नाल्यांमधील अवैधरीत्या वाळू पोहचत असल्याचे चित्र आहे. हरतोटी येथे भातकुलीचे तहसीलदार अजित येळे यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतरही वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात तहसील प्रशासनाला यश आले नाही. ६ महिन्यांपूर्वी येथील तहसीलदार सुरेश बगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर बगळे यांनी कारवाईचा धडाका लावून अमरावती तालुक्यांतर्गत येणाऱ्या परिसरासह शहरातूनही वाळूसाठा जप्त केला होता. मात्र येळे यांच्या प्रकरणानंतर महसूल प्रशासन शांतच आहे. भातकुली तालुक्यातील कुंड खुर्द, हातुर्णा, सातुर्णा, गोपगव्हाण, अळणगाव, हरताळा, वासेवाडी, निंभा, परलाम या भागातून दिवसागणिक वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.