लेहेगाव : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरखेड हद्दीतील अडगाव ते ग्राम विचोरी रोड मार्गावर रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. ९ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी ट्रॅक्टरचालक आकाश मोहोड (३०) व मालक राजेश राजगुरू (३४, दोन्ही रा. अडगाव) या दोघांना अटक करण्यात आली. पाच हजार रुपयांच्या रेतीसह पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त करून शिरखेड पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला. मोर्शी येथून रामू महादेव परतेती याच्याकडून १४ हजार १०० रुपयांची दारूसह २१ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, कर्मचारी दीपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, नीलेश डांगोरे व नितेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली.