यात्रा महोत्सव : हजारो भाविकांनी घेतले दर्शनचांदूररेल्वे : संत ज्ञानेश्वरानंतर आपल्या शिष्याला साक्षी ठेवून वयाच्या सोळाव्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सवाला मंगळवारी प्रारंभ झाला. राज्यातील दीड लाख भाविकांनी उपस्थिती दर्शविली.चांदूररेल्वे तालुक्यातील घुईखेड हे तीर्थक्षेत्र बेंडोजीबाबा संजीवन समाधी नावाने राज्यात प्रसिध्द आहे़ दरवर्षी येथे लाखो भाविकांचा मेळा भरतो. मंगळवारी या पुण्यतिथी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाल्याने राज्यातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे़ एका निपुत्रिक धनगराला जंगलात आठ वर्षांचा मुलगा सापडला. त्याच्या पाठीवर बेंड असल्यामुळे त्याला बेंडोजी म्हणून ओळखू लागले़ अवघ्या दहाव्या वर्षी चार दिवसांपर्यंत बेंडोजी बाबांनी अखंड समाधी लावली होती़ तद्नंतर संत एकनाथ महाराज व त्यांचे शिष्य केशवपुरी महाराज त्यांचे शिष्योत्तम बुध्दपुरी महाराजांनी बेंडोजीबाबांना नाथ संप्रदायाच्या परंपरेत आणले अनेक पुरातन इतिहास संत बेंडोजी महाराज यांचा आहेत़ बेंडोजी महाराज नाथ संप्रदायी मालिकेतील आहेत़ बेंडोजी महाराजांचा काळ इस १३०० ते १३५० पर्यंतचा असावा समाधीनंतरही श्री बेंडोजी बाबांच्या कृपेने अनेकाचे कल्याण झाले अशातच घुईखेडचे अमृत पाटील घुईखेडकर यांचा जलोधर हा भयंकर रोग कृपाप्रसादाने दूर झाला़ याचे ऋण म्हणून त्यांनी ८०० एकर जमीन संस्थानाला दान दिली़ संत बेंडोजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी संजीवन समाधी घुईखेड येथे घेतली. त्यामुळे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून बेंडोजी महाराज यांची ओळख आहे़ संत बेेंडोजी महाराज संस्थांच्या वतीने पुण्यतिथी यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून सात दिवस पहाटे काकडा आरती, रामधून, सामुदायिक प्रार्थना तर हभप रामाश्रयी, सु़श्री़ रामप्रियाजी यांचे भागवत, दुपारी खंजेरी भजन व रात्री कीर्तन आयोजित करण्यात आले असून राज्यातील भाविक येथे संजीवन समाधी दर्शनासाठी हजेरी लावायला सुरूवात केली आहे़(तालुका प्रतिनिधी)दिंडीची परंपरा कायम पंढरपूर येथे अनेक वर्षांपासून बेंडोजी महाराज यांची पालखी दरवर्षी जाते़ घुईखेड ते पैठण व तेथून आळंदी, ते पंढरपूर असा ४८ दिवसाचा प्रवास या वारीतून होतोय वऱ्हाड प्रांतातील ही एकमेव वारी अनेक वर्षा पासून जात आहे़ सध्या या दिंडीचा मान माऊलीच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकऱ्यामध्ये १७ वा क्रमांक आहे़ही परंपरा कायम आहे़ शके १८१९ मध्ये म्हणजे अंदाजे सन १८९७ या वर्षात दिंडीचा क्रमांक श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीमागे दुसऱ्या स्थानी आज आहे़ संत बेेंडोजी महाराज संस्थानजवळ सन १३३७ साली तयार केलेला भालदार चोपदाराजवळ असणारा बिल्ला आजही आहे़ संस्थानाला ६७३ वर्ष पूर्ण झाली तसेच ११३ वर्ष दिंडीला पूर्ण झाल्याने हे दोन बिल्ले आजही संस्थानजवळ असल्याची माहिती विश्वस्थ प्रवीण घुईखेडकर यांनी दिली़
संत बेंडोजीबाबांनी सोळाव्या वर्षी घेतली समाधी
By admin | Updated: February 10, 2016 00:27 IST