शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आरक्षित भूखंडाच्या विक्रीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:58 IST

महापालिकेच्या सृतिकागृह-रुग्णालयाकरिता आरक्षित असलेला भूखंड एका संस्थेने विक्रीस काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परस्पर भूखंड विक्रीस काढल्याने सहकारी संस्था, तालुका उपनिबंधकांनी संस्थेस नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदीपनगर क्रमांक १ मधील संस्थेचा प्रताप : तालुका उपनिबंधकांची नोटीस, महापालिकेचे मौन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या सृतिकागृह-रुग्णालयाकरिता आरक्षित असलेला भूखंड एका संस्थेने विक्रीस काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परस्पर भूखंड विक्रीस काढल्याने सहकारी संस्था, तालुका उपनिबंधकांनी संस्थेस नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. तब्बल १६ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडाची किंमत बाजारभावानुसार सुमारे ३ ते साडेतीन कोटींच्या घरात आहे. महापालिकेसह तालुका उपनिबंधकांची कुठलीही परवानगी न घेता संबंधित संस्थेने हा गोरखधंदा चालविल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.राजापेठ ते छत्री तलाव मार्गावरील दीपनगर क्रमांक १ मध्ये विद्युत कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची जागा आहे. ही जागा खुले पटांगण म्हणून विकासाकरिता सोडण्यात आलेली होती. परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून महापालिकेच्यावतीने या जागेवर सृतिकागृह-रुग्णालयाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र, त्यावर महापालिका आर्थिक परिस्थितीमुळे दवाखाना बांधू शकली नाही. सदर जागा ही विकास योजनेमध्ये आरक्षण क्रमांक २५४ (दवाखाना व प्रसूतीगृह) करिता आरक्षित ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच अभिन्यास मंजूर नकाशामध्ये ती जागा दवाखान्याकरिता राखीव म्हणून ठेवण्यात आल्याचा महापालिकेच्या नगररचना विभागाचा अहवाल आहे. विशेष म्हणजे संस्थेनेच आरक्षण विकसित करण्याकरिता संमती दिली आहे. असे असताना ती जागाच परस्पर विक्रीस काढण्यामागची भूमिका संशयास्पद आहे, आरक्षित असलेल्या भूखंडाचा संबंधित मालकास मोबदला द्यावा लागतो, आरक्षण काढून घेण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. महापालिकाच नव्हे, तर नगरविकास खात्यासह नगररचना विभागाची पूर्वपरवानगी त्यासाठी आवश्यक असते, अशी अनेक प्रकरणे मोबदल्यासाठी न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. त्या पार्श्वभूमिवर या संस्थेने परस्परच आरक्षित भूखंड विक्रीस काढण्याच्या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले आहे.भूखंड विक्रीसाठी जाहिरातहा १६,००० चौरस फुटांचा प्लॉट विक्री करता यावा म्हणून विद्युत कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी स्थानिक वृत्तपत्रातून जाहिरात दिली. कोरे निविदापत्र २०० रुपये शुल्क भरून १५ मार्च २०१८ ते २० मार्च २०१८ पर्यंत दुपारी २ ते ५ दरम्यान गृहनिर्माण संस्थेद्वारा संस्थेचे सचिव विजय गुल्हाने यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे जाहिरातीत नमूद आहे. शिवाय सिलबंद निवदा देखील २१ मार्च २०१८ पर्यंत स्वीकारण्यात आल्या.२० एप्रिल रोजी नोटीसआरक्षित भूखंड विक्रीस काढल्याची माहिती मिळताच काही नागरिकांकडून याबाबत तक्रार करण्यात आली. तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून संस्थेला २० एप्रिल २०१८ रोजी नोटीस बजाविण्यात आली. सद्यस्थितीत संस्थेत सभासदत्व मिळण्याबाबत अर्ज व कलम २३ नुसार अर्ज या कार्यालयाकडे दाखल झाले आहे. त्या अनुषंगाने संस्था स्थापन करताना खुला असलेला, आरक्षित असलेला भूखंडाची विक्री उपनिबंधक कार्यालयाच्या पूर्वपरवागनी शिवाय करता येत नसल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे.भूखंड विक्रीबाबतची निविदाच संस्थेकडून रद्द करण्यात आली आहे. तो भूखंड विकण्याबाबत संस्थेच्या आमसभेत निर्णय झाला. संस्थने त्यासाठी एआरकडे परवानगी मागितली. महापालिकेचा संस्थेच्या व्यवहाराशी संबंध नाही.- विजय गुल्हाणे, सचिव, सहकारी गृहनिर्माण संस्था