शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री, ‘एफडीए’चा नाही अंकुश

By admin | Updated: April 20, 2017 00:06 IST

‘मनभरी’ उत्पादनाच्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली.

‘मनभरी’उत्पादकाला अभय : तक्रार दिल्यानंतरही गांभीर्य नाही अमरावती : ‘मनभरी’ उत्पादनाच्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली. मात्र, एफडीए अधिकाऱ्यांनीया तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नसून एफडीएचे कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना अभय तर नाही ना, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. दस्तुरनगर मार्गावरील पूजा कॉलनीतील रहिवासी अमित विकासपंत सहारकर (३३) यांनी १७ एप्रिल रोजी कंवरनगरातील मनभरी प्रतिष्ठानातून ‘सुपर व्हाईट सॅन्डविच ब्रेड’चे एक पाकिट खरेदी केले. ते घरी जाऊन उघडताच पाकिटातील ब्रेड बुरशीजन्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यागंभीर प्रकाराची तक्रार सहारकर यांनी एफडीएकडे केली. तक्रार प्राप्त होताच एफडीए अधिकाऱ्यांनी मनभरी प्रतिष्ठानात जाऊन कालबाह्य ब्रेडविषयी चौकशी करणे अपेक्षित होते. त्यांच्या प्रतिष्ठानात आणखी कालबाह्य खाद्यपदार्थ आहेत का, याची शहानिशा एफडीएद्वारे करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे तक्रारीचे गांभीर्य एफडीए अधिकाऱ्यांना नसल्याचे एकूण चित्र आहे. शहरात ग्राहकांना कालबाह्य व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना एफडीएच्या या सुस्त धोरणामुळे अधिकच बळ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोेग्य धोक्यात येऊ शकते. एफडीएने याप्रकाराची तत्काळ दखल घेऊन कालबाह्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात.