शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्यपदार्थांची विक्री

By admin | Updated: May 10, 2017 00:15 IST

तापत्या उन्हाचा फायदा उचलीत बडनेरा रेल्वेस्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्रेते पाण्याच्या बाटल्या व शितपेय चढ्या भावाने विकत असल्याची ओरड प्रवाशांमध्ये आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांची लूट, कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : तापत्या उन्हाचा फायदा उचलीत बडनेरा रेल्वेस्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्रेते पाण्याच्या बाटल्या व शितपेय चढ्या भावाने विकत असल्याची ओरड प्रवाशांमध्ये आहे. याकडे रेल्वे प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने त्यांचे चांगलेच फावते आहे. प्रवाशांची लूट थांबावी, अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत.बडनेरा रेल्वेस्थानक जंक्शन म्हणून परिचित आहे. येथून दर दिवसाला ४० ते ४५ प्रवाशी रेल्वे गाड्या धावतात. खास करून उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. येथून हजारो प्रवाशी चढतात व उतरतात. गाडीतील प्रवाशींना गर्मीमुळे थंडपेय व पाण्याच्या बिसलेरी जास्त विकत घेतात. नेमका याचाच फायदा उचलीत खाद्यपदार्थ विक्रेते चढ्या भावाने त्यांच्याकडील माल प्रवाशांना विकत आहे. बिसलेरी बॉटलची किंमत १२ रूपये आहे. रेल्वेस्थानकावर ती सर्रास २० रुपयाने विकल्या जात आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर उन्हाळ्यात अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा मोठा भरणा असतो. १०० च्यावर विक्रेते रेल्वे स्थानकावर असतात. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तसेच प्रवाशांची होत असणाऱ्या लुटीकडे मात्र रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशी चांगलाच त्रस्त आहे. प्रवाशांच्या अशा होत असणाऱ्या लुटीकडे का दुर्लक्ष होत आहे हा प्रश्न मात्र प्रवाशांना त्रस्त करणारा आहे. खाद्य पदार्थ, थंड पेय व बिसलेरीमधून प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशा संतप्त प्रतिक्रिया बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये आहे.प्रवाशांनी हरकत घेतल्यास अरेरावीप्रवाशांना चढ्या भावात बडनेरा रेल्वे स्थानकावर सर्वच वस्तू विकल्या जात आहे. एखाद्या प्रवाशाने वाढीव दराबाबत हरकत घेतल्यास त्या प्रवाशासोबत अवैध खाद्यपदार्थ विक्रेते अरेरावीची भाषा बोलत असल्याचे प्रवाशांमध्ये बोलल्या जात आहे.