शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ प्रलंबित प्रकरणे १५ दिवसांत निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:04 IST

विभागातील शालार्थची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढून स्था. स्व. संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ९ व १० वी करिता ४० विद्यार्थ्यांमागे शिक्षकांची ३ पदे मंजूर केली जाणार आहे. ५ जुलै २०१६ पूर्वीच्या शिक्षकांना अनिवार्य असलेली संचमान्यतेची अट रद्द करण्याबाबत शिक्षक संचालकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.

ठळक मुद्देशिक्षकांना दिलासा : शेखर भोयर यांची शिक्षण संचालकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील शालार्थची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढून स्था. स्व. संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ९ व १० वी करिता ४० विद्यार्थ्यांमागे शिक्षकांची ३ पदे मंजूर केली जाणार आहे. ५ जुलै २०१६ पूर्वीच्या शिक्षकांना अनिवार्य असलेली संचमान्यतेची अट रद्द करण्याबाबत शिक्षक संचालकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.विभागातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शेखर भोयर यांनी शनिवारी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने, संचमान्यता व शालार्थचा कार्यभार असलेले प्रशासकीय अधिकारी राजेश शिंदे तसेच कमविचा कार्यभार असलेले भुसे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संतोष कुर्हेकर, कमर इकबाल व सुमित वानखडे आदी उपस्थित होते. प्लान वेतनाचे नॉन प्लान वेतनात रूपांतर करावे, प्रलंबित वैद्यकीय देयकाचा प्रश्न निकाली काढावा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करावा आदी विविध प्रश्नांबाबत सकारात्मक संवाद झाल्याचे भोयर म्हणाले.अन्य समस्याही मार्गी लागणारया चर्चेदरम्यान शिक्षकांचे सेवासातत्य, पदमान्यता अवैध ठरविल्यासंदर्भातील चर्चा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, २००५ पूर्वी अंशत: अनुदानित तत्त्वावर रुजू झालेल्या व उच्च न्यायालयातून स्थगिती मिळालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करणे, सेवेत असताना जे कर्मचारी मृत पावले आहेत, त्यांच्या पाल्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळवून देणे आदीविषयी सकारात्मक चर्च्चा झाल्याचे शेखर भोयर म्हणाले.