रमजान ईद अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे. शहरातही ईदेचा बाजार सजला आहे. शेवया, घिवर, फेण्या, खजूर आणि तत्सम साहित्याची दुकाने जवाहरगेट परिसरात सजली आहेत. मुस्लीम बांधव सहकुटुंब बाजारात जाऊन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.
ईदसाठी सजला बाजार...
By admin | Updated: July 12, 2015 00:24 IST