शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साहेब आले; बोर्ड लावून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:04 IST

‘डिजिटल व्हिलेज’ हरिसालमध्ये डिजिटलच्या नावावर केवळ खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. ‘हॉटेलमध्ये आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारतो’ असा बोर्ड लावला आहे.

ठळक मुद्देकुठे आहे डिजिटल? : हॉटेलसह आरोग्य केंद्रातही स्वाईप मशीन नाही

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : ‘डिजिटल व्हिलेज’ हरिसालमध्ये डिजिटलच्या नावावर केवळ खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. ‘हॉटेलमध्ये आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारतो’ असा बोर्ड लावला आहे. प्रत्यक्षात तेथे स्वाइप मशीनच नाही. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा रोखीनेच रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे सत्य आहे.हरिसाल येथे झालेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी येथील पूजा रेस्टॉरेंटमध्ये फराळ केला. पैसे चुकविण्यासाठी त्यांनी हॉटेलमालक रमेश मेश्राम यांच्याकडे एटीएम कार्ड दिले. मात्र, त्यांनी नकार देत रोख रक्कम मागितली. यावेळी आंदोलनात सामील होण्यासाठी आलेले महेंद्र गैलवार, दयाराम काळे, मिश्रीलाल झारखंडे, पूजा येवले, अमोल बोरेकर, विशाल खानझोडे यांनी चौकशी केली असता, वेगळेच तथ्य समोर आले. हॉटेल संचालक मेश्राम म्हणाले, आठ ते दहा दिवसांपूर्वी बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक आले होते. त्यांनी बोर्ड लावले. पण, स्वाईप मशीन दिली नाही. हा बोर्ड राहू द्या, तुम्हाला मशीन देऊ तेव्हा त्यात तुम्ही ग्राहकाजवळून रक्कम घ्यायची, ती तुमच्या खात्यात जमा होईल, असे बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितल्याचे ते म्हणाले.हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांकडून रोख रक्कम घेतली जात असल्याचे चित्र आहे. येथेसुद्धा उपस्थित कर्मचाºयांकडून चिठ्ठी काढल्यावर एटीएम कार्ड दिले. ते बघून डॉक्टरसह परिचारिकेला हे येथे चालत नाही, असे स्पष्ट उत्तर मिळाले. आम्हाला ट्रेनिंग दिले; मात्र स्वाइप मशीन दिली नाही, असे म्हणीत चिठ्ठीचे पाच रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी केली.