शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मेळघाटातील वाघांची सुरक्षा दुर्लक्षित, सीबीआय चौकशी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

फोटो २७एएमपीच०३ कॅप्शन - मृतावस्थेत आढळलेला वाघ अनिल कडू परतवाडा (अमरावती) : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच ...

फोटो २७एएमपीच०३ कॅप्शन - मृतावस्थेत आढळलेला वाघ

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यात घडत असलेल्या आणि उघडकीस येत असलेल्या घटनांवरून मेळघाटातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. राजस्थानातील वाघांच्या शिकारीबाबत सीबीआय चौकशी होते, तर मेळघाटातील वाघांच्या मृतदेहाची का नाही, असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मृत्यूनंतर सात ते आठ दिवसांनंतर मेळघाटात त्या वाघाचा मृतदेह कधी तरी पुढे येतो. तेव्हा तो मृतदेह सडलेला, कुजलेला असतो. मागील तीन वर्षांत अशाच पाच घटना पुढे आल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील, ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीट अंतर्गत येणाऱ्या कपूरखेडा नाला येथे एका वाघाचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल नऊ दिवसांनी एप्रिल २०१८ मध्ये आढळून आला. याच व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वनपरिक्षेत्रातील धोंडा आकार राऊंडमधील जीतापूर बीटमध्ये टी-३५ नामक वाघिणीचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल सहा दिवसांनंतर, ३ मार्च २०१९ ला आढळून आला. अंबाबरवामधील टी-२३ नामक वाघाचा मृतदेह लागूनच असलेल्या मध्य प्रदेशातील सिमेत मृत्यूनंतर १५ दिवसांनंतर एप्रिल २०२० मध्ये उघडकीस आला.

रायपूर वनपरिक्षेत्रातील माडीझडप परिसरात मृत्यूनंतर पाच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला वाघाचा मृतदेह आढळून आला. तत्कालीन प्रादेशिक पूर्व मेळघाट वनविभागात चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथा परिसरात मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी जानेवारी २०१९ मध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला. यातील वाघाच्या कुजलेल्या मृतदेहाचे काही अवयव प्रयोगशाळेतही पाठविले जातात. वाघ मरतात, सडतात, कुजतात. या मृत वाघांच्या फायली बनविण्यात येतात आणि पुढे त्या घटना फाईलबंद केल्या जातात.

बॉक्स

वाघाला आयडी नाही

व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातही वाघ आहेत. ज्या प्रादेशिक वनविभागात वाघ आहेत त्या वाघांना ओळख नाही. आयडी नाही. त्यामुळे ते बेवारस ठरत आहेत हे मोथा आणि रायपूरमध्ये आढळून आलेल्या वाघांच्या मृतदेहाकडे लक्ष वेधल्यास पुरेसे ठरले आहेत.

‘त्या वाघांचे पुढे काय?

वाघांच्या शिकारीच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने २०१८ मध्ये एक गुन्हा उघडकीस आणला. यात सन २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांत चार वाघ आणि एका बिबटाची शिकार प्रादेशिक वनविभागाच्या अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रातील केल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पराड यांचे समक्ष आरोपींचे बयाण घेण्यात आले. ही चौकशी गुंडाळून प्रकरण फाईलबंद केले गेले.

सीबीआय चौकशीची मागणी

सन २००५ मध्ये मनमोहनसिंग असताना राजस्थानमधील सिरस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. सन २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूरकडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. याच धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारी आणि आढळून येत असलेल्या वाघांच्या मृतदेहांची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.