शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा होणार अभेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:44 IST

शहराच्या हदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची झालेली दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी चालणारे अवैध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा व अन्य उपाययोजनांसाठी ३० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देखबरदारी : जिल्हा परिषदेच्या बैठकीत ठोस उपाययोजना; ४० लाखांचा प्रस्ताव, भिंतीची उंची अडीच फूट वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या हदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची झालेली दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी चालणारे अवैध प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा व अन्य उपाययोजनांसाठी ३० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली.जिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर मैदानाची दुरवस्था झाली आहे. शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. यासोबतच या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटना घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या येथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या सर्व प्रकारामुळे मैदानाचे गतवैभव नामशेष होत आहे. त्यामुळे सायन्स कोअर मैदानाची सुरक्षा तसेच या परिसरात स्वच्छता राखण्याचे अनुषंगाने जिल्हा परिषद पदाधिकारी व सीईओंना शहराचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मैदानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत मैदानाच्या सुरक्षितेसाठी जिल्हा परिषदेने ४० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. या प्रस्तावाला येत्या १० जून रोजी शिक्षण व बांधकाम समिती मंजुरी देईल. यानंतर प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला जाणार आहे. यानंतर लगेच कामाच्या निविदा काढून संपूर्ण मैदानाची भिंत अडीच फुटाने उंच करून त्यावर तारेचे कुंपण, तीन प्रवेशद्वार, सीसीटीव्ही कॅ मेरे, हायस्माट लाइट व सुरक्षा रक्षक या उपाययोजना केल्या जाणार आहेत.बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख सीईओ मनीषा खत्री, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, बांधकाम विभागाच्या उपअभियंता मेश्राम, शाखा अभियंता संजय ठाकूर आदी उपस्थित होते.डीपीसीकडे एक कोटींच्या निधीचा प्रस्तावजिल्हा परिषदेच्या सायन्स कोअर शाळेच्या मैदानाच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी ३१ मे रोजी होत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक ीत सुमारे एक कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्यावतीने आ. वीरेंद्र जगताप मांडणार आहेत. यामध्ये मैदानात जवळपास ४०० मीटर ट्रॅक, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा भिंतीसाठी चेनलिंक फेसिंग, चहुबाजूंनी हायमास्ट लाइट व अन्य महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे. सदर प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार आहे. हा निधी मिळाल्यास या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना होऊन येथील अवैध प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.