शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सदोष गॅस शेगडी, जिल्हा ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:08 IST

आॅनलाईन खरेदीनंतर नादुरूस्त झालेल्या शेगडीबाबत सेवा न पुरविणाऱ्या शिनाग अलाईड एन्टरप्रायजेससह फ्लिपकार्टला जिल्हा ग्राहक मंचाने दहा हजार रुपयांचा दंड १० टक्के व्याजासह देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे तक्रारकर्त्या ज्येष्ट नागरिकाला दिलासा मिळाला .

ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण निकाल : फ्लिपकार्ट, शिनाग अलाईड एन्टरप्रायजेसला ठोठावला १०,००० रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅनलाईन खरेदीनंतर नादुरूस्त झालेल्या शेगडीबाबत सेवा न पुरविणाऱ्या शिनाग अलाईड एन्टरप्रायजेससह फ्लिपकार्टला जिल्हा ग्राहक मंचाने दहा हजार रुपयांचा दंड १० टक्के व्याजासह देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे तक्रारकर्त्या ज्येष्ट नागरिकाला दिलासा मिळाला .मुदलियार नगरातील रहिवासी नारायण गणपत मेश्राम (७०) यांनी ५ फेब्रुवारी २०१७ रोजी फ्लिपकार्टवर आॅनलाईन पध्दतीने सुर्या कंपनीची गॅस शेगडी ३ हजार २२९ रुपयांत बुक केली. दहा दिवसांनंतर त्यांना शेगडी प्राप्त झाली. शेगडीसोबत एक वर्षांचे गॅरंटी व वॉरंटी कार्ड मिळाले. शेगडी बिघडल्यास सूर्या कंपनीची जबाबदारी राहील, असे मेश्राम यांना कळविण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांतच ती शेगडी बंद पडल्याने मेश्राम यांनी कंपनीशी संपर्क केला. ई-मेलद्वारे कंपनीकडे तक्रार नोंदविली. मात्र, कंपनीकडून मेश्राम यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मेश्राम यांनी वकीलांमार्फत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली.मात्र कंपनीने उत्तर दिले नाही. त्यामुळे मेश्राम यांनी ४ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदविली. ग्राहक मंचाकडून भिवंडी येथील फ्लिपकार्टचे व्यवस्थापक व बंगरुळू येथील शिनाग अलाईड एन्टरप्रायजेसला नोटीस जारी केल्या. ग्राहक मंचाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर विरुध्द पक्षांचा दोष सिध्द झाला. ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्य शुभांगी कोंडे यांनी निर्णय देत शिनाग अलाईड एन्टरप्रायजेस (बंगरुळू) व फ्लिपकार्र्टने तक्रारकर्त्याला गॅस शेगडीचे ३ हजार २२९ रुपये ३० दिवसांच्या आत परत करावे, त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून १० टक्के व्याज द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश दिले. या प्रकरणात तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड.पी.एच.मुंडवाईक व फ्लिपकार्टतर्फे अ‍ॅड. आशीष उके यांनी बाजू मांडली.जनतेला आवाहनजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहकांसाठी कार्यरत असून, त्यांची पिळवणूक व फसवणूक होत असेल, तर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुदाम देशमुख यांनी केले आहे.तक्रारींच्या अनुषंगाने दोन्ही बाजू पडताळून ग्राहक मंचात खटला चालला. त्यावर अध्यक्षांनी निर्णय दिला. ग्राहकांनी न्याय मिळविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.- श्री.र. मोरस्कर, सहायक, अधीक्षक, ग्राहक मंच.