शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण, दुर्गम भागात हातभट्ट्या पेटल्या

By admin | Updated: April 17, 2017 00:01 IST

हायवेपासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्वप्रकारची दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालामुळे शहरी व ग्रामीण भागात दारू मिळणे जिकरीचे झाले आहे.

मद्यपींनी लढविली क्लृप्ती : ‘५०० मीटर‘च्या निर्बंधाने ‘गावठी’ला पुन्हा सुगीचे दिवसअमरावती : हायवेपासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्वप्रकारची दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालामुळे शहरी व ग्रामीण भागात दारू मिळणे जिकरीचे झाले आहे. आता दारूसाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांनी ‘थोडी थोडी पिया करो’ चा मार्ग अवलंबून गावठी दारूकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागात पुन्हा हातभट्ट्या धगधगू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार देशभरातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर आत असलेली दारुची सर्व दुकाने बंद झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानांना सील करून कागदोपत्री बंद केले आहे. अर्थात कायदेशीररित्या ही दुकाने बंद झाली असली तरी नियमबाह्य चोरीछुप्या मार्गाने दारूविक्री सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी चोरट्या मार्गाने दारूविक्री होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील दारू दुकाने बंद झाल्याने हातभट्ट्या पुन्हा पेटू लागल्या असून आदिवासी भागातील हातभट्ट्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. हातभट्ट्यांनी पेट घेतल्याने ‘गुळ व नवसागर’च्या मागणीत वाढ झाली आहे. मोहाच्या फुलांचाही भाव तेजीत आहे. शहरी व ग्रामीण भागातील महामार्गावरील दारूविक्रीची दुकाने न्यायालयाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून बंद झाल्याने विदेशी दारू मिळणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक गावपाड्यात हातभट्ट्यांवर तयार होणाऱ्या गावठी दारूला पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचे चित्र आहे. मद्यपींनीच शोधला फंडाअमरावती : मद्यपींची दारूसाठी सुरू असलेली तगमग, शहरातील मोजक्या शिल्लक राहिलेल्या दारू दुकानांमधील मद्यपींची वाढती गर्दी, यातून उदभवणारे वादाचे प्रसंग लक्षात घेता मद्यपींनीच यावर ‘गावठी’चा तोडगा शोधला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तुलनेने कमी दरात उपलब्ध होणारी गावठी दारू पिण्यासाठी आता शहरातील मद्यपीनी देखील ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्यास आश्चर्य वाटू नये. (प्रतिनिधी)