शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:04 IST

शहरात पाच रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोट ेस्वीकारण्याबाबत आदेश निर्गमित केले.

ठळक मुद्देनागरिक, व्यावसायिकांचा विश्वास : नोट स्वीकारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात पाच रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोट ेस्वीकारण्याबाबत आदेश निर्गमित केले. त्यामुळे पाच रुपयांची नोट चलनात असल्याचा विश्वास नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाला. आता पाच रुपयांच्या नोट चालू लागल्या, असे म्हणायला काही हरकत नसल्याचे दिसून येत आहे.अमरावती शहरातील बहुतांश छोटे तथा मोठ्या व्यावसायिकांनी पाच रुपयांची नोट स्वीकारणे बंदच केले होते. जुन्या पाच रुपयांच्या काही नोटा जीर्ण झाल्यामुळे अनेक जण ती नोट नाकारू लागले होते. त्यातच चांगल्या पाच रुपयांच्या नोटाही स्वीकारणे नागरिक व व्यावसायिकांनी बंद केले. चलनात असलेल्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे अनेकांजवळ पाच रुपयांच्या नोटांचा खच जमा झाला. त्यात पाच रुपयांची नोटा घेत नसल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले होते. ‘पाच रुपयांच्या नोटांची अघोषित बंदी’ या मधळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर अनेकांनी विश्वासाने पाच रुपयांची नोट स्वीकारणे सुरु केले. त्यातच या वृत्ताची दखल अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी घेतली. त्यांनी अग्रणी बॅकेला परिपत्रक काढून सर्व बँकांना सूचना देण्यास सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनीही पाच रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे नागरिकांना आवाहन केले. ‘लोकमत’चे वृत्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना पाहता, आता शहरात पाच रुपयांच्या नोटा स्वीकारणे सुरु झाले आहे.पाच रुपयांच्या नोटा चलनात आहेत. यासंबंधी अग्रणी बॅकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. याशिवाय बँकानाही कळविण्यात आले आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी पाच रुपयांची नोट स्वीकारावी.- जितेंद्र झा,व्यवस्थापक, अग्रणी बॅक.